शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडे पक्ष,नेते फोडण्यासाठी पैसा आहे,परंतु शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही;अंजली दमानिया यांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 17:18 IST

- अंजली दमानिया म्हणाल्या, राजकारणात सगळ्या राजकीय पक्षाला वेगवेगळ्या पद्धतीने गुंड लागतात. हे जर सगळे बंद करायचे असेल तर राजकारणाचे चित्र बदलण्याची गरज आहे.

पुणे : सत्ताधारी पक्षाकडे राजकारणी फोडण्यासाठी पैसा आहे. पक्ष फोडण्यासाठी पैसा आहे; परंतु पावसामुळे हवालदिल झालेल्या, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसा नाही. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. सरकार शेतकऱ्यांचा केवळ मते फोडण्यासाठी वापर करतो, अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली.

माहिती अधिकार कायद्याच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी माजी सनदी अधिकारी महेश झगडे, विजय कुंभार आदी उपस्थित होते.

अंजली दमानिया म्हणाल्या, राजकारणात सगळ्या राजकीय पक्षाला वेगवेगळ्या पद्धतीने गुंड लागतात. हे जर सगळे बंद करायचे असेल तर राजकारणाचे चित्र बदलण्याची गरज आहे. पण, तो कुठलाही राजकारणी करत नाही. कारण त्यांना दहशत निर्माण करून, भीती निर्माण करून लोकशाहीत आपल्याला आपल्यावर राज्य करायचे आहे. पुणे पोलिस आयुक्त यांनी घायवळला बंदुकीची परवानगी रद्द केलेली असताना त्यांना जी दिली गेली, ती कोणामुळे दिली गेली. गृहराज्यमंत्री जर ती परवानगी देतात, तर हे काय चाललंय? असा प्रश्न पडतो.पोलिस फक्त वरून फोन आला तरच काम करतात आणि हे आपले दुर्दैव आहे. त्यासाठी सगळ्यांना लढायचे आहे. पण कसं लढायचं? काय लढायचं? या देशाला पुढची दिशा आपल्याला चांगली देण्याची गरज आहे. राज्यातील पोलिस खरेच काही काम करतेय का? कारण आता जर आपण चोरीचे एखादे प्रकरण घेऊन पोलिस स्टेशनला गेलो, तर पोलिस त्यावर काडीमात्रही काही काम करत नाही, असेही त्या म्हणाल्या.

अर्थमंत्री दहावी पास

राज्याचे अर्थमंत्री दहावी पास आहेत. त्यांना अर्थकारण खरंच कळतं का? क्षुल्लक गोष्टीवरून आपण राजकारण करत असतो; मात्र महाराष्ट्रावर सध्या नऊ लाख कोटींचे कर्ज आहे, हे पैसे आपण कुठून आणणार? त्याच्यावर कोणीच बोलत नाही. कारण आपले अर्थमंत्री दहावी पास आहे, अशा शब्दात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया अजित पवार यांच्यावर टीका केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Government Prioritizes Political Maneuvering Over Farmers' Welfare: Anjali Damania

Web Summary : Anjali Damania criticizes the government for prioritizing poaching politicians over supporting struggling farmers. She questions the competence of Maharashtra's finance minister, highlighting the state's massive debt and the need for political reform to combat corruption and fear-mongering.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडanjali damaniaअंजली दमानियाPuneपुणेMahayutiमहायुती