शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

सरकार देतेय ना,मग घ्यायचे ! पुढचे पुढे बघू; तब्बल २१ लाख बनावट शेतकऱ्यांना केंद्राचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 13:28 IST

ई-केवायसी पूर्ण न केल्याने डिसेंबरच्या हप्त्याला मुकणार : सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी

नितीन चौधरी

पुणे : सरकार देतेय ना,मग घ्यायचे ! पुढचे पुढे बघू. या मानसिकतेतून राज्यातील लाखो शेतकरीकेंद्र सरकारकडून वर्षाला मिळणाऱ्या ६ हजारांचे अनुदान आजवर लाटत आले. मात्र,आता डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यासाठी ई-केवायसी असलेल्याच शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. परिणामी राज्यातील तब्बल २१ लाख बनावट शेतकऱ्यांना दणका बसला आहे. यात सर्वाधिक १ लाख ७३ हजार बनावट शेतकरी सोलापूर जिल्ह्यात आहेत.

पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना ३१ मार्च २०१९ रोजी सुरू केली. याच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून देण्यात येणारी एकूण सहा हजाराची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात प्रती २००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये जमा केली जात आहे. हे अनुदान थेट खात्यात जमा केले जात आहे. सुरुवातीला यात सरसकट अनुदान दिले जात होते. नंतर त्यात बदल करून शेती नावावर असलेले मात्र,प्राप्तिकर भरणारे,सरकारी कर्मचारी व अधिकारी,मोठे शेतकरी अशांना हे अनुदान मिळणार नाही, असे स्पष्ट केले गेले. त्यानुसार या सर्व शेतकऱ्यांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे.

ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी सर्वच शेतकऱ्यांना अनेकदा मुदतवाढ दिली. मात्र,पात्र नसल्याने लाखो शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जे शेतकरी ई-केवायसी पूर्ण करणार नाहीत अशांना अनुदान मिळणार नाही,असे वारंवार सांगूनही या शेतकऱ्यांनी ते केले नाही. ई-केवायसी न केल्यास आणि पात्रता निकषात नसणाऱ्या शेतकऱ्यांकडून अनुदान परत घेतले जाईल,असा इशारा देऊनही राज्यातील सुमारे २१ लाख २ हजार ९०८ शेतकऱ्यांचे ई-केवायसी झालेले नाही.

या अनुदानाचा १२ वा हप्ता म्हणून,१६ हजार कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला. याच वेळी अशा शेतकऱ्यांचे अनुदान देता येणार नाही,असे केंद्र सरकारने बजावले होते मात्र,अनेक राज्यांच्या विनंतीनंतर केंद्राने हा १२ वा हप्ता १७ ऑक्टोबर रोजी वितरित केला. मात्र,डिसेंबरमधील हप्त्यासाठी ई-केवायसी बंधनकारक केले आहे. तशा आशयाचे पत्रच केंद्र सरकारने राज्यांना पाठवले. त्यामुळे राज्य सरकारने ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना आता शेवटची मुदत म्हणून महिनाअखेर ई-केवायसी करण्याचे बंधन घातले आहे. त्यासाठी सर्व संबंधित जिल्हाधिकारी व तहसीलदारांना ई-केवायसी शक्य तेवढे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

''ई-केवायसी पूर्ण न केलेल्यांमध्ये सरकारी अधिकारी, कर्मचारी,वकील,डॉक्टर,प्राप्तीकर भरणारे आहेत. तसेच १० टक्के खरे शेतकरी देखील आहेत. ई-केवायसी पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी ते लवकरात लवकर पूर्ण करावे. - वरिष्ठ अधिकारी,कृषी विभाग''

जिल्हानिहाय ई-केवायसी पूर्ण न केलेले शेतकरी

रायगड - १३,२०९वाशिम - १९,६३७भंडारा - २८,७९२गडचिरोली - २१,४२०सातारा - ६४,२०६गोंदिया - ३५,७३०नाशिक - ६५,९२९चंद्रपूर - ४२,३१८लातूर - ४८,८८१उस्मानाबाद - ४४,४०६जळगाव - ७३,०३९हिंगोली - ३३,३६७वर्धा - २६,५७७नगर - १,१३,३६३नंदुरबार - २२,०४४परभणी - ५९,६३८नांदेड - ८६,४०५कोल्हापूर - ९४,७१६औरंगाबाद - ७९,०५१सिंधुदुर्ग - २९,७३८अमरावती - ६५,२२०बुलढाणा - ७९,०३२पुणे - १,०५,३८८रत्नागिरी - ३८,९१९धुळे - ४२,०८७यवतमाळ - ७४,८८०जालना - ८०,३७७अकोला - ५२,६०६पालघर - २७,१५३सांगली - १,१७,१५८नागपूर - ५१,४२७सोलापूर १,७३,४४७बीड - १,४०,५५०ठाणे - ५२,१९८

एकूण २१,०२,९०८

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारMONEYपैसाSocialसामाजिक