Pune: बलात्काराची तक्रार मागे न घेतल्याने तरुणीसह कुटुंबीयांना मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By नितीश गोवंडे | Updated: February 21, 2024 15:03 IST2024-02-21T15:02:55+5:302024-02-21T15:03:25+5:30

तरूणीसह तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली, याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला....

The girl and her family were beaten up for not withdrawing the complaint of rape | Pune: बलात्काराची तक्रार मागे न घेतल्याने तरुणीसह कुटुंबीयांना मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune: बलात्काराची तक्रार मागे न घेतल्याने तरुणीसह कुटुंबीयांना मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : बलात्काराची तक्रार मागे न घेतल्याने तरुणीच्या घरात शिरून टोळक्याने तिचा भाऊ, बहिणीला चाकूचा धाक दाखवून मारहाण केल्याची घटना लष्कर भागात घडली. तरूणीसह तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

अलसबा जावेद शेख, जावेद शेख, आयान शेख, सलीम शेख, अल्फेज शेख यांच्यासह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी अलसबा शेखच्या भावाविरोधात तरुणीने बलात्कार केल्याप्रकरणी तक्रार दिली होती. तरुणीने तक्रार मागे न घेतल्याने आरोपी तरुणीवर चिडले होते. त्यानंतर आरोपी शेख तरुणीच्या घरात शिरले. तिची लहान बहीण, दोन भावांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी तरुणीच्या लहान बहिणीवर चाकू उगारून तिला धमकावले. बलात्काराची तक्रार मागे न घेतल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारू, अशी धमकी आरोपींनी दिली. घाबरलेल्या तरुणीने लष्कर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनीषा वलसे करत आहेत.

Web Title: The girl and her family were beaten up for not withdrawing the complaint of rape