बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या मित्रांची कार उलटली, एक ठार तर एक जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 09:02 IST2024-02-05T09:01:59+5:302024-02-05T09:02:28+5:30

याबाबत विशालची आई सुनीता धारासिंग राठोड (४०) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली....

The car of the friends who went for a walk in Bopadeo Ghat overturned, one was killed and another seriously injured | बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या मित्रांची कार उलटली, एक ठार तर एक जण गंभीर जखमी

बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या मित्रांची कार उलटली, एक ठार तर एक जण गंभीर जखमी

पुणे : बोपदेव घाटात भरधाव कार उलटून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात एकजण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी कार चालकाविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशाल धारासिंग राठोड (१९, रा. येवलेवाडी, कोंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातात विल्यम रवींद्र मेहेंदळे गंभीर जखमी झाला आहे. कार चालक अभिषेक ऊर्फ गणपत गायकवाड (२४, रा. काकडे वस्ती, कोंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशालची आई सुनीता धारासिंग राठोड (४०) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल, त्याचा मित्र विल्यम, अभिषेक कारने फिरायला गेले होते. बोपदेव घाटात मध्यरात्री दोनच्या सुमारास भरधाव कार उलटली. कारमधील विशाल, विल्यम यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान विशालचा मृत्यू झाला. याप्रकरणी अभिषेकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक विकास बाबर पुढील तपास करत आहेत.

Web Title: The car of the friends who went for a walk in Bopadeo Ghat overturned, one was killed and another seriously injured