‘हाक दिली लेकीने, संख्या आली लाखोंने’, न्याय मिळाला पाहिजे, वैभवी देशमुखची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:12 IST2025-01-06T12:11:38+5:302025-01-06T12:12:14+5:30
प्रशासनाला माझी विनंती आहे की, ज्याप्रमाणे माझ्या वडिलांची हत्या झाली, इतर कुणाची होऊ नये म्हणून आरोपींना शिक्षा द्यावी

‘हाक दिली लेकीने, संख्या आली लाखोंने’, न्याय मिळाला पाहिजे, वैभवी देशमुखची मागणी
पुणे: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. या मागणीसाठी पुण्यात रविवारी जनआक्रोश मोराचा काढण्यात आला. या मोर्चात लाखो मराठा बांधव, नागरिक सहभागी झाले होते. पुण्यातील सर्वपक्षीय नेत्यांबरोबरच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख, पत्नी अश्विनी देशमुख, न्याय मिळवण्यासाठी मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी आम्ही न्याय मागत आहोत, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी वैभवी देशमुख हिने केली आहे.
वैभवी म्हणाली, शिवरायांचे विचार जपले असते तर ही हत्या झाली नसती. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. ‘हाक दिली लेकीने, संख्या आली लाखोंने’ अशी परिस्थिती झाली आहे. प्रशासनाला माझी विनंती आहे की, ज्याप्रमाणे माझ्या वडिलांची हत्या झाली, इतर कुणाची होऊ नये म्हणून आरोपींना शिक्षा द्यावी. आमची मागणी हीच आहे की, आम्ही न्याय मागत आहोत, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी तिने केली आहे.
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, शिवसंग्राम संघटनेच्या अध्यक्षा ज्योती मेटे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, उद्धवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, काॅंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, विकास पासलकर आदी उपस्थित होते. यावेळी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनीसुद्धा मोर्चाला उपस्थिती लावली होती.
बजरंंग सोनवणे म्हणाले, बीड आणि परभणीमध्ये अत्यंत खेददायक घटना घडली आहे. त्यामुळे मानवतेला काळीमा फासवणारी आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे. महाराष्ट्रातील सरकारला जोपर्यंत या आरोपींना फाशी देण्याची सद्बुद्धी येत नाही, तोपर्यंत मोर्चे सुरूच राहणार आहेत. बीड जिल्ह्यातील गुंडशाही एवढी वाढली की जीणं मुश्किल झाले आहे. लोकं रस्त्यावर येण्यास घाबरतात. यामध्ये अनेक आरोपी आहेत, त्यांना सर्वांना सहआरोपी करावे. गुंडशाही आणि झुंडशाही करणाऱ्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे.
प्रशांत जगताप म्हणाले, मागच्या ३० दिवसांत बीड, परभणी जिल्ह्यात ज्या घटना घडल्या, त्यामुळे महाराष्ट्रातील समाजमन दुखावले आहे, संतोष देशमुख यांनी मराठी बाणा जपला होता. त्यामुळे त्यांना सुरक्षा रक्षकाची मदत केली. याचा राग वाल्मिक कराड आल्यामुळे देशमुखांची हत्या करण्यात आली. या आरोपींना धनंजय मुंडे यांनी वाचवत आहे. हा मोठा आकाचे मंत्रिपद काढून घ्यावे. परंतु आरोपींना शिक्षा देताना मुख्यमंत्री पळवाट काढत आहेत. यावरून त्यांची नियत साफ नाही, असे दिसते.