Pune Crime| चांदखेडमध्ये आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 14:49 IST2022-09-06T14:48:45+5:302022-09-06T14:49:27+5:30

चांदखेड ( पुणे ) : शिरगाव परदंवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चांदखेड येथे कासारसाई ओवळे रस्त्याच्या कडेला एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह ...

The body of an unknown person was found in Chandkhed | Pune Crime| चांदखेडमध्ये आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

Pune Crime| चांदखेडमध्ये आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

चांदखेड (पुणे) : शिरगाव परदंवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चांदखेड येथे कासारसाई ओवळे रस्त्याच्या कडेला एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. याबाबत चांदखेड गावचे पोलीस पाटील दत्तात्रय माळी यांनी शिरगाव परदंवडी पोलील स्टेशनला माहिती दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता एका अनोळखी इसमाचा मृतदेह रस्त्याच्याकडेला मृत अवस्थेत आढळून आला.

मृतदेहाच्या डाव्या डोळयाच्या खाली अवजड वस्तूने मारल्याच्या खुणा असून मृतदेहाचे वय अंदाजे पंचवीस ते तीस आहे. अंगामध्ये लाल रंगाचा टी शर्ट, काळया रंगाची पँट घातलेली असून त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर समाधान असे इंग्रजीमध्ये व डाव्या हाताच्या मनगटावर जमुना असे मराठीमध्ये,व उजव्या हाताच्या बोटामध्ये शितल असे मराठीमध्ये गोंदले असल्याचे आढळून आले.

सदरचा प्रकार घातपाताचा असून मृतदेह या ठिकाणी टाकून देण्यात आला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास शिरगाव-परदंवडी पोलीस करत आहे

Web Title: The body of an unknown person was found in Chandkhed