Ajit Pawar Death: बारामती दुर्घटनेतील ब्लॅक बॉक्स सापडला, विमान कोसळण्यापूर्वी कॅप्टन शांभवी पाठक काय म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 11:42 IST2026-01-29T11:39:50+5:302026-01-29T11:42:24+5:30
Baramati Plane Crash Black Box Found: बारामती विमान अपघात प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची माहिती मिळाली आहे. तपास यंत्रणांना अपघातग्रस्त लर्नजेट ४५ विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून, यामुळे अपघाताचे गूढ उकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Ajit Pawar Death: बारामती दुर्घटनेतील ब्लॅक बॉक्स सापडला, विमान कोसळण्यापूर्वी कॅप्टन शांभवी पाठक काय म्हणाली?
बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघाताच्या तपासादरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली. अपघातानंतर अवघ्या २४ तासांत तपास पथकाने अपघातग्रस्त विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' शोधून काढला. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला असून, यामुळे अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.
दिल्लीच्या व्हीएसआर एव्हिएशन कंपनीच्या 'लर्नजेट ४५' या विमानाचा ब्लॅक बॉक्स घटनास्थळावरून जप्त करण्यात आला. डीजीसीए आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाने अपघातस्थळाची कसून पाहणी केली. विमानाचे इंजिन, पंखे आणि इतर अवशेषांची तपासणी करून नमुने गोळा करण्यात आले. ब्लॅक बॉक्समधील डेटा आता विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवला जाईल, ज्यामुळे तांत्रिक बिघाड की मानवी चूक, हे स्पष्ट होईल.
Charter plane crash landing in Baramati | Cockpit voice recorder and flight data recorder have been recovered: Ministry of Civil Aviation (MoCA)
— ANI (@ANI) January 29, 2026
विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्यानंतर किंवा विमान नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून कॅप्टन शांभवी पाठक हिने "ओह शिट!", असे शब्द उच्चारले, असे सांगितले जात आहे. मात्र, कॅप्टनच्या या शेवटच्या शब्दांबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरच्या अंतिम तपासणीनंतरच यावर शिक्कामोर्तब होईल.
एएआयबी अधिकाऱ्यांनी सांगितले की, ब्लॅक बॉक्स सापडल्यामुळे अपघाताला कारणीभूत ठरलेल्या घटनांचा अचूक क्रम आता लावता येईल. विमान किती उंचीवर होते, हवेचा वेग काय होता आणि पायलटच्या शेवटच्या हालचाली काय होत्या? याची सर्व माहिती आता समोर येईल.