Winter Update: वातावरण सारखंच बदलतंय! पुन्हा थंडीचे कमबॅक; आता १० दिवस गारठा

By श्रीकिशन काळे | Updated: December 8, 2024 17:43 IST2024-12-08T17:42:41+5:302024-12-08T17:43:03+5:30

गेल्या चार-पाच दिवस पुण्यातील तापमान हे २० अंशाच्या जवळपास हाेते, अचानक रविवारी थंडीत वाढ झाली असून तापमान १६ अंशावर नोंदवले गेले

The atmosphere is changing! Cold Comeback Again; It has been raining for 10 days now | Winter Update: वातावरण सारखंच बदलतंय! पुन्हा थंडीचे कमबॅक; आता १० दिवस गारठा

Winter Update: वातावरण सारखंच बदलतंय! पुन्हा थंडीचे कमबॅक; आता १० दिवस गारठा

पुणे : सध्या तापमानाचा पारा वाढल्याने किमान तापमानातही वाढ झाल्याचे अनुभवायला मिळत आहे. पुणे शहरामध्ये एका दिवसात चार अंशाने किमान तापमानात घट झाली. परिणामी रविवारची (दि. ८) सकाळ पुणेकरांना जराशी हुडहुडी भरणारी ठरली. थंडीमध्ये आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला.

गेल्या काही दिवसांमध्ये ‘फेंजल’ चक्रीवादळाने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील महाराष्ट्रातील थंडी चांगलीच वाढवली होती. पण वादळ जमिनीवर आल्यानंतर थंडी गायब झाली. पण आता पुन्हा उत्तर भारतात, मार्गस्थ होत असलेले पश्चिमी (झंझावात) वारे व समुद्र सपाटीपासून साडेबारा किमी. उंचीवर वाहणारे उच्च वेगवान पश्चिमी वाऱ्यांचे झोतमुळे थंडीत वाढ होईल. रविवारपासून (दि. ८) खान्देश, नाशिक पासून थंडीमध्ये हळूहळू वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पुढील १० दिवस म्हणजे बुधवार दि.१८ डिसेंबरपर्यंत थंडी टिकून राहण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र थंडीचा परिणाम दोन दिवस उशिराने म्हणजे मंगळवार (दि. १०) नंतर थंडी जाणवेल.

विदर्भ वगळता महाराष्ट्रात सध्या तरी पावसाची शक्यता जाणवत नाही. विदर्भातही आज व उद्याच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. परवा, मंगळवार (दि. १०) नंतर तेथेही वातावरण निवळेल, अशी माहिती सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

पुण्यात थंडी वाढली!

गेल्या चार-पाच दिवस पुण्यातील किमान तापमान हे २० अंशाच्या जवळपास हाेते. त्यामुळे उष्णता जाणवत होती. अचानक रविवारी थंडीत वाढ झाली आणि किमान तापमान १६ अंशावर नोंदवले गेले.

पुण्यातील किमान तापमान

दि. ४ : २२.५
दि. ५ : १९,९

दि. ६ : १९.८
दि. ७ : १९.५

दि. ८ : १६.४

Web Title: The atmosphere is changing! Cold Comeback Again; It has been raining for 10 days now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.