शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

पाश्चिमात्य साम्राज्यवादी धोरणामुळे दहशतवादात वाढ - तलमीज अहमद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 19:22 IST

पाश्चिमात्य साम्राज्यवादी धोरणामुळे दहशतवाद तसेच जिहाद सारख्या गोष्टी वाढत आहे. जिहाद ही संकल्पना न संपणारी नसून वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात राहील. आज धार्मिक संकल्पनांचा वापर मोठ्या प्रमाणात राजकीय लोक त्यांचा फायद्यासाठी करत आहे, असे प्रतिपादन सौदी अरेबियाचे भारतातील माजी  राजदूत तलमीज अहमद यांनी व्यक्त केले. 

पुणे - पाश्चिमात्य साम्राज्यवादी धोरणामुळे दहशतवाद तसेच जिहाद सारख्या गोष्टी वाढत आहे. जिहाद ही संकल्पना न संपणारी नसून वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात राहील. आज धार्मिक संकल्पनांचा वापर मोठ्या प्रमाणात राजकीय लोक त्यांचा फायद्यासाठी करत आहे, असे प्रतिपादन सौदी अरेबियाचे भारतातील माजी  राजदूत तलमीज अहमद यांनी व्यक्त केले. सविताबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग आणि यशवंतराव चव्हाण नॅशनल सेंटर ऑफ इंटरनॅशनल सेक्युरिटी अँड डिफेन्स अनलिसिस विभागाच्या संयुक्त विद्यमाने आंतराष्ट्रीय संबंध या व्याख्यानमालेत 'पोलिटिकल इस्लाम अँड ग्लोबल जिहाद; चैलेंजस फॉर ग्लोबल सेक्यरिटी' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अहमद बोलत होते. या प्रसंगी निवृत्त लेफ्टनंट जनरल पी. एम. हारीस, माजी राजदूत तसेच आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक श्रीनिवास सोहनी, संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे उपस्तीत होते.

अहमद म्हणाले, धर्म या संकल्पनेवर विचारवंतांचा पगडा आहे. याबरोबरच धर्माला प्रसिद्धी देणारे आणि गुढवादी संकल्पनेत वावरणारे धर्माचा आधार घेतात. सर्वसामान्यांचा धर्मावर असलेल्या विश्वासाचा फायदा आज राजकीय लोक त्याच्या स्वार्थासाठी वापरतात. त्याचा श्रद्धेचा वापर करून त्यांना राजकीय प्रवाहात ही मंडळी खेचताना आज जगात दिसते.

श्रीनिवास सोहनी म्हणाले, इस्लाम मध्ये असलेल्या काही गोष्टीचा काही कट्टर लोक गैरफायदा घेत आहेत. लोकांसमोर त्याचे चुकीचे सादरीकरण करून त्यांना दहशतवादी बनविलेले जात आहे. त्यांना आणखी कट्टर कसे बनवता येईल यावर ते भर देत आहेत. हे धोक्याची बाब आहे.

पी. एम हारीस म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून लोकांवर धर्माचा पगडा वाढत आहे. पूर्वीच्या तुलनेत आज मुस्लिम महिलांमध्ये बुरखा घालण्याचे प्रमाण वाढले आहे. पुर्वी ही परिस्तिथी नव्हती. हा कट्टरता वाद का वाढत आहे याचा अभ्यास आज होणे गरजेचे आहे. हे करत असताना त्यांना सर्वसमावेशक विकासात आणणे गरजेचे आहे. याचबरोबर याचे जागतिक, आर्थिक, सामाजिक तसेच लष्करी दृष्ट्या होणाऱ्या परिणामांचाही अभ्यास होणे गरजेचे आहे. 

टॅग्स :TerrorismदहशतवादPuneपुणेnewsबातम्या