शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बर्थ डे पार्टीवरून परतताना काळाचा घाला! कार बसवर आदळून एकाचा मृत्यू, पाच जखमी…

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 12:28 IST

पार्टी करून परतताना वडगाव पुलाजवळ भीषण अपघात

धायरी : सातारा दिशेकडून मुंबईकडे जाणाऱ्या बाह्यवळण महामार्गावरील वडगाव बुद्रुक पुलाजवळ रस्त्यात उभ्या असलेल्या बसला पाठीमागून आलेल्या स्विफ्ट कारने जोरात धडक दिली. पहाटे पाच वाजता झालेल्या या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, पाचजण जखमी झाले आहेत.

स्मीत समीर पवार (वय १९, रा. आई बंगला, मोरया पार्क, पिंपळे गुरव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोहम आलीश खळे (१९, रा. कॅफेल वर्ल्ड, डी पी रोड, औंध), प्रतीक दीपक बंडगर (१९, रा. गांगुर्डेनगर, पिंपळे गुरव), मकरंद ऊर्फ अथर्व हंबीरराव जेडगे (१९, रा. कामेरी, ता. वाळवा, जि. सांगली), आयुष आंबिदास काटे (२०, रा. सिद्धी टॉवर, दापोडी), हर्ष नितीन वरे (रा. पिंपळे गुरव) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

याबाबत पोलिस अंमलदार दत्तात्रय पंढरीनाथ राख यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आयशर मिनी बसचालक चंद्रशेखर बाबासो सुरवसे (वय ४३, रा. अभिनव कॉलेजसमोर, दैवत बिल्डिंग, नर्हे, मूळ रा. आंबप, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, साताराहून मुंबईकडे जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्यावरील वडगाव पुलाच्या सुरुवातीला चंद्रशेखर सुरवसे याने सचिन ट्रॅव्हल्सची मिनी बस रस्त्याच्या कडेला उभी केली होती. पहाटेच्या सुमारास पिंपरी चिंचवडच्या दिशेला जाणाऱ्या स्विफ्ट कारचालकाला रस्त्यात उभी असलेली ही मिनी बस दिसली नाही. त्याने उजवीकडून कार पुढे काढण्याच्या प्रयत्नात वेगाने मिनी बसला मागून धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की कारची पुढील बाजू पूर्णपणे आत गेली होती. कारमध्ये पुढे बसलेले अडकून पडले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढले. अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सिंहगड रस्ता वाहतूक विभागाच्या पोलिसांनी अपघातग्रस्त कार बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच पोलिस उपायुक्त

अमोल झेंडे, संभाजी कदम, सहायक पोलिस आयुक्त भाऊसाहेब पठारे, सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाईंगडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे, सहायक पोलिस निरीक्षक समीर चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक अमोल मालुसरे, अक्षय पाटील यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस करीत आहेत.

बर्थडे सेलिब्रेशनसाठी गेले होते तरुण...हर्ष वरे या तरुणाचा शनिवारी वाढदिवस असल्याने त्याच्यासह इतर पाच मित्र एका कारमधून सिंहगड किल्ल्याच्या दिशेला गेले होते. रात्री बारा वाजल्यानंतर त्यांनी बर्थडे सेलिब्रेशन केले. त्यानंतर ते पहाटेच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाले असता वडगाव पुलावर हा अपघात घडला. यात ‘बर्थडे बॉय’ हर्ष वरे याच्यासह इतर चारजण गंभीर जखमी झाले असून, एकाचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस