पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, आयशरला जीपची धडक; एकाचा मृत्यू, नऊजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 18:41 IST2023-06-15T18:39:17+5:302023-06-15T18:41:00+5:30

या अपघातात एकाचा मृत्यू, तर नऊजण गंभीर जखमी...

Terrible accident on Pune-Solapur highway, Eicher hit by jeep; One dead, nine injured | पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, आयशरला जीपची धडक; एकाचा मृत्यू, नऊजण जखमी

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, आयशरला जीपची धडक; एकाचा मृत्यू, नऊजण जखमी

भिगवण (पुणे) :पुणे-सोलापूर महामार्गावर भिगवण गावच्या हद्दीत बंद पडलेल्या आयशर टेम्पोला स्क्रार्पिओ धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, तर नऊजण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.१५) सकाळी घडली.

अपघातात जालिंदर बाळासाहेब वीरकर (वय ३६, रा. चिखली, ता. हवेली) यांचा मृत्यू झाला आहे, तर वैशाली राजू फडके, मच्छिंद्र बाळासाहेब वीरकर, लक्ष्मीबाई बाळासाहेब वीरकर, प्रीतम जालिंदर वीरकर, मंगल राहुल मेदनकर, विशाल विलास मोरे, संगीता विलास मोरे, राजू गोविंद फडके हे नऊजण किरकोळ, तसेच गंभीर जखमी झाले आहेत.

वीरकर मोरे कुटुंबीय आपल्या ताब्यातील जीपमधून (एमएच १४ जीए ५५१४) गाडीतून पुणे बाजूकडून सोलापूरकडे जात होते. दरम्यान, भिगवण गावच्या हद्दीत ज्योती हॉटेल येथून समोरील गाडीला ओव्हरटेक करीत असताना मुख्य मार्गाच्या कडेला थांबलेल्या (एमएच ४३ यू ६८१७) आयशर टेम्पोला पाठीमागून धडकून अपघात झाला. याबाबत फिर्यादी राजू फडके यांनी खबर दिली. तपास पोलिस हवालदार लोढी करीत आहेत.

Web Title: Terrible accident on Pune-Solapur highway, Eicher hit by jeep; One dead, nine injured