Pune: घर मालकिणीकड़ून 'या' कारणावरून भाडेकरू मुलींना बेदम मारहाण; रूममध्ये कोंडूनही ठेवले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 03:20 PM2022-03-03T15:20:27+5:302022-03-03T15:40:31+5:30

पेईंग गेस्ट (PG) म्हणून रहात असलेल्या दोन तरुण बहिणीनी कोंडून ठेवून मारहाण केल्याची घटना चंदन नगर येथे घडली

Tenant girls beaten by landlord for this reason He also kept a lock in the room in yerwada | Pune: घर मालकिणीकड़ून 'या' कारणावरून भाडेकरू मुलींना बेदम मारहाण; रूममध्ये कोंडूनही ठेवले

Pune: घर मालकिणीकड़ून 'या' कारणावरून भाडेकरू मुलींना बेदम मारहाण; रूममध्ये कोंडूनही ठेवले

googlenewsNext

येरवडा : पेईंग गेस्ट (PG) म्हणून रहात असलेल्या दोन तरुण बहिणीना कोंडून ठेवून मारहाण केल्याची घटना चंदन नगर येथे घडली. रूम खाली करताना डिपॉझिट परत मागितल्याच्या कारणावरुन भाड़ेकरू मुलींना घर मालकिणीकड़ून बेदम मारहाण करण्यात आली आहे. चंदनगर मध्ये हा प्रकार घडला असून चंदननगर पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पल्लवी चक्रनारायण (वय २०) व रुचिता चक्रनारायण (वय २१) अशी मारहाण झालेल्या मुलींची नावे आहेत. त्यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात घर मालक तृप्ती माने व श्वेता थोरात यांच्या विरुद्ध कोंडून ठेवून मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. मुळच्या रत्नागिरीच्या असलेल्या या मुली नोकरी तसेच शिक्षणासाठी चंदननगर येथे तृप्ती माने व श्वेता थोरात यांच्याकड़े पेईंग गेस्ट म्हणून राहत होत्या. रूम खाली करत असताना चार हजार रुपये डिपॉझिट परत मागितल्याच्या कारणावरुन त्यांना घरात कोडुंन ठेवून मारहाण केली. या मुलींचा मित्र त्यांच्या मदतीला आल्यानंतर त्यांची  सुटका झाली. घडलेल्या प्रकारानंतर मुलीनी चंदननगर पोलीसात बुधवार (दि. ३) मार्च रोजी रात्री उशिरा तक्रार दिली आहे. 

Web Title: Tenant girls beaten by landlord for this reason He also kept a lock in the room in yerwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.