Accident: पुणे - नाशिक महामार्गावर टेम्पोची पादचाऱ्यास धडक; चालक फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 14:08 IST2021-10-31T14:08:23+5:302021-10-31T14:08:30+5:30
भरघाव आयशर टेम्पोने पाठीमागून जोराची धडक दिल्याने सदर इसमाच्या डोक्याला जबर मार लागून ठार झाला आहे

Accident: पुणे - नाशिक महामार्गावर टेम्पोची पादचाऱ्यास धडक; चालक फरार
चाकण : रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या पादचाऱ्यास पुणे - नाशिक महामार्गावर कुरुळी फाटा ( ता. खेड ) येथे भरधाव आयशर टेम्पोने चिरडल्याची घटना ( दि. २९ ) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. भरघाव आयशर टेम्पोने पाठीमागून जोराची धडक दिल्याने सदर इसमाच्या डोक्याला जबर मार लागून ठार झाला आहे.तर या घटनेनंतर टेम्पो चालक वाहनासह फरारी झाला होता.
संजयकुमार रामजी रामबिंद ( वय - ३० वर्षे,सध्या रा.निघोजे, ता.खेड,) असे या अपघातात ठार झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. राम केवलराम बिहारी ( वय.३६ वर्षें, रा.निघोजे ) याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयकुमार हा त्याचा मित्र लखनकुमार बिंद हे दोघे रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान तो पुणे - नाशिक महामार्गावरील कुरुळी फाट्याजवळ पायी रस्त्याने चालत जात असताना, त्यावेळी पुणे बाजूकडून नाशिक बाजूकडे भरधाव आयशर टेम्पोने संजयकुमार यास पाठीमागून जोरात डोक्याला ठोस बसली. घटनेनंतर टेम्पो चालक महेंद्र विठ्ठल पाटील ( वय.३६ वर्षे,रा.पथराळ,ता.दननगाव,जि. जळगाव ) हा वाहनासह पळून जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.