Pune: मोशीमध्ये टेम्पोला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 13:49 IST2023-07-22T13:47:53+5:302023-07-22T13:49:12+5:30

हा अपघात बुधवारी (दि. १९) दुपारी मोशी येथील देहू रस्ता परिसरात घडला....

Tempo hit by bike from behind in Moshi Death of a biker pune latest crime news | Pune: मोशीमध्ये टेम्पोला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

Pune: मोशीमध्ये टेम्पोला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपरी : रस्त्याने समोर जाणाऱ्या टेम्पोला पाठीमागून दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. १९) दुपारी मोशी येथील देहू रस्ता परिसरात घडला.

याप्रकरणी टेम्पो चालक गजानन त्र्यंबक दराडे (वय. ३४, रा. मोईगाव) यांनी गुरुवारी (दि.२०) भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून मयत दुचाकीस्वार शानएआलम वखार अहमद शेख (वय २१, रा मोशी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील टाटा ४०७ टेम्पो घेऊन मोशी- देहू रस्त्याने चिखलीकडे जात होते. जय भारत चौकाच्या अलीकडे शेख हा दुचाकी भरधाव वेगाने घेऊन आला व त्याने फिर्यादीच्या टेम्पोला पाठीमागून धडक दिली. यामध्ये शेख गंभीररीत्या जखमी झाला व यातच त्याचा मृत्यू झाला.

Web Title: Tempo hit by bike from behind in Moshi Death of a biker pune latest crime news