पुणे - नाशिक महामार्गावर टेम्पो चालकाला लुटले; १५ हजारांचा ऐवज घेऊन फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 13:39 IST2021-07-27T13:39:49+5:302021-07-27T13:39:57+5:30
टेम्पोला दुचाकी आडवी लावून टेम्पो थांबविला चोरट्यांनी चालकाकडून पाच हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल व रोख रक्कम १० हजार रुपये हिसकावुन बऴजबरीने काढून घेऊन मोटारसायकलीवरुन पुण्याकडे निघून गेले.

पुणे - नाशिक महामार्गावर टेम्पो चालकाला लुटले; १५ हजारांचा ऐवज घेऊन फरार
राजगुरूनगर : पुणे - नाशिक महामार्गावर खेड तालुक्यातील थिगळस्थळ येथे टेम्पोला दुचाकी आडवी लावून टेम्पो चालकाला अज्ञात चोरट्यांनी लुटले. या घटनेत चालकाकडून बळजबरीने १५ हजाराचा ऐवज चोरटयांनी घेऊन पोबारा केला आहे. याबाबत चालक उत्तम नारायण पोखरकर (वय३२ ).रा. संत ज्ञानेश्वर महाराज संतवाडी (ता जुन्नर ) यांनी खेडपोलिस ठाण्यात फीर्याद दिली आहे.
खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर थिगळस्थळ येथे दोन अज्ञात चोरटे दुचाकी वरून आले. चालक पोखरकर यांच्या टेम्पोला दुचाकी आडवी लावून टेम्पो थांबविला चोरट्यांनी चालकाकडून पाच हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल व रोख रक्कम १० हजार रुपये हिसकावुन बऴजबरीने काढून घेऊन मोटारसायकलीवरुन पुण्याकडे निघून गेले. या घटनेबाबत पुढील तपास खेड पोलिस करत आहे.