Pune News: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर कंटेनरला धडकून टेम्पोचालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 13:40 IST2024-04-08T13:39:51+5:302024-04-08T13:40:29+5:30
मुंबई मार्गिकेवर नवीन बोगद्यामध्ये उतारावर हा अपघात झाला....

Pune News: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर कंटेनरला धडकून टेम्पोचालकाचा मृत्यू
लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर रविवारी सकाळी टेम्पो व कंटेनरमध्ये झालेल्या अपघातात टेम्पोचालकाचा मृत्यू झाला आहे. रविवारी (दि.७) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुंबई मार्गिकेवर नवीन बोगद्यामध्ये उतारावर हा अपघात झाला.
यामध्ये टेम्पोचालक विनोद यादव (रा. वापी, गुजरात) याचे वाहनावरील नियंत्रण सुटून टेम्पो पुढे जात असलेला कंटेनरला पाठीमागून जोरात धडकला. या धडकेत टेम्पोतील चालकाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच अपघाताच्या ठिकाणी आय. आर. बी. पेट्रोलिंग, देवदूत टीम, बोरघाट वाहतूक पोलिस यंत्रणा, लोकमान्य ॲम्बुलन्स सेवा यांनी धाव घेत मदतकार्य केले. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्यात आली असून वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली आहे.