शिंगाडेवस्तीवर देवळांची लूट; रोख रकमेसह १ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लुटला, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 23:04 IST2026-03-14T23:03:26+5:302026-03-14T23:04:29+5:30

Crime News: उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील माळवाडी नं.२ च्या हद्दीतील शिंगाडेवस्ती परिसरातील श्रीनाथ मस्कोबा देवाच्या मंदिरातील चांदीची स्वयंभू मुर्ती,चांदीचा घोडा, जोगेश्वरी देवीचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र,रोख रकम व बाळूमामांच्या मंदिरातील दीड किलोच्या चांदीच्या पादुका असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे.

Temples looted in Singadevasti; Property worth Rs 1 lakh 35 thousand including cash looted | शिंगाडेवस्तीवर देवळांची लूट; रोख रकमेसह १ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लुटला, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल 

शिंगाडेवस्तीवर देवळांची लूट; रोख रकमेसह १ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लुटला, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल 

इंदापूर  - उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील माळवाडी नं.२ च्या हद्दीतील शिंगाडेवस्ती परिसरातील श्रीनाथ मस्कोबा देवाच्या मंदिरातील चांदीची स्वयंभू मुर्ती,चांदीचा घोडा, जोगेश्वरी देवीचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र,रोख रकम व बाळूमामांच्या मंदिरातील दीड किलोच्या चांदीच्या पादुका असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. पुजाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटयाविरुध्द इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आण्णा भैरु शिंगाडे (वय ३९ वर्षे,रा.माळवाडी नं.२ शिंगाडेवस्ती,ता. इंदापूर) असे फिर्यादीचे नाव आहे. शुक्रवारी रात्री साडेआठ ते शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सविस्तर हकिकत अशी की, फिर्यादी अण्णा शिंगाडे याच्या घराशेजारी श्रीनाथ मस्कोबा देवाचे मंदिर आहे. शिंगाडे हेच मंदिराचे पुजारी आहेत. मंदिरामध्ये देवाची स्वयंभू मुर्ती, घोड्याची चांदीची मुर्ती, जोगेश्वरी देवीची मुर्ती व मंदिराच्या आत दानपेटी आहे.

शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पुजाअर्चा करुन मंदिराचे दारास कुलुप लावून शिंगाडे घरी गेले.सकाळी सहा वाजता आपला चुलतभाऊ दिनेश दत्तात्रय शिंगाडे याच्याबरोबर मंदिराच्या परिसरात आले.त्यावेळी त्यांना मंदिराचा दरवाजा उघडा व कोयंडा तुटलेल्या अवस्थेत दिसला. मंदिरात जाऊन खात्री केल्यानंतर देवाची चांदीची स्वयंभू मूर्ती, चांदीचा घोडा, जोगेश्वरी देवीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व दान पेटी दिसुन आली नाही.

आजुबाजूच्या परिसरात मंदिरातील वस्तूंचा शोध घेत असताना, बाळुमामांच्या मंदिरातील दीड किलो वजनाच्या चांदीच्या पादुका देखील दिसून आल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी अमोल रामदास शिंगाडे,अक्षय रामदास शिंगाडे व वस्तीवरील लोकांचे मदतीने दोन्ही मंदिरातील गहाळ झालेल्या वस्तूंचा शोध घेतला, मात्र त्या मिळून आल्या नाहीत. अज्ञात चोरट्याने त्या वस्तू चोरल्याची खात्री झाल्यानंतर इंदापूर पोलीस ठाण्यात जावून शिंगाडे यांनी फिर्याद नोंदवली. त्यावरुन अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याची झाली लूट 
दहा हजार रुपये किंमतीची ७५० ग्रॅम वजनाची देवाची चांदीची स्वयंभू मुर्ती,दहा हजार रुपये किमतीचा २५० ग्रॅम वजनाचा चांदीचा घोडा,सहा हजार रुपये किमतीचे दोन ग्रॅम वजनाचे देवीचे सोन्याचे मंगळसूत्र,९९ हजार रुपये किमतीच्या बाळू मामांच्या दीड किलो वजनाच्या चांदीच्या पादुका व दानपेटीतील दहा हजार रुपयांची रोकड

Web Title : शिंगाडेवस्ती में मंदिरों में लूट; 1.35 लाख रुपये का सामान चोरी।

Web Summary : इंदापूर के शिंगाडेवस्ती में मंदिरों में लूटपाट। चांदी की मूर्तियाँ, सोने का हार और नकदी सहित 1.35 लाख रुपये की चोरी। अज्ञात चोरों के खिलाफ मामला दर्ज किया गया है।

Web Title : Temples looted in Shingadewasti; valuables worth ₹1.35 lakh stolen.

Web Summary : Temples in Shingadewasti, Indapur, were looted. Silver idols, a gold necklace, and cash totaling ₹1.35 lakh were stolen. Police have registered a case against unknown thieves.