शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

तेजस मधील उड्डाण अद्भुत : लष्कर प्रमुख बिपीन रावत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 6:19 PM

भारतीय हवाई दलाच्या मागणी नुसार तेजस या भारतीय बनावटीच्या हलक्या लढाऊ विमानात सर्व बदल करण्यात आले असून या विमामानाना अंतिम उड्डाण परवाना बुधवारी बंगरुळुरु येथील एलहांका विमानतळावर देण्यात आला.

निनाद देशमुख बंगळुरू  :  तेजस हे अतिशय चांगल्या दर्जाचे विमान आहे. या विमानातून उडण्याच्या अनुभव अद्भुत आणि विलक्षण होता. विमानाचे अव्हीओनिक्स चांगले असून लक्ष्य  भेदण्याची क्षमता अचूक आहे, असे उद्गार  भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी भारतीय बनावटीच्या तेजस या विमानातून उड्डाण केल्यानंतर काढले. 

भारतीय  हवाई दलाच्या मागणी नुसार तेजस या भारतीय बनावटीच्या हलक्या लढाऊ विमानात सर्व बदल करण्यात आले असून या विमामानाना अंतिम उड्डाण परवाना बुधवारी बंगरुळुरु येथील एलहांका विमानतळावर देण्यात आला. यामुळे हे विमान भारतीय हवाई दलात सामाविस्ट होण्यास सज्ज झाले आहे.  यानंतर गुरुवारी जनरल रावत यांनी तेजस विमानातून उड्डाण करत या भारतीय बनावटीच्या विमानाच्या क्षमतेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.  गुरुवारी दुपारी १२ वाजता जनरल रावत हे एलहांका विमानतळावर दाखल झाले. यानंतर डीआरडीओ आणि हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड च्या अधिकाऱ्यांसमोर ते विमानतळावर दाखल झाले. यावेली एअर व्हाईस मार्शल एन. तिवारी यांनी विमानाचे सारथ्य केले. जवळ पास ३० मिनिटे जनरल रावत यांनी या विमानातून उड्डाण केले. 

विमानातून उड्डाण केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले तेजस हे विमान आधुनिक तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्रांनी परिपूर्ण आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव उड्डाणा दरम्यान घेतला. भारतीय हवाई दलात हे विमान दाखल झाल्यास आपली मारक क्षमतेत भर पडणार आहे. हवाई दल प्रमुख धानोआ यांच्याच्यासाठी हा महत्वाचा क्षण आहे. विमानातुन आम्ही सर्व सामान्य उड्डाण केले. तसेच मोजक्या हवाई कसरती केल्या. यावेळी वैमानिक तिवारी यांनी विमानाच्या लक्ष्य  भेदण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. या विमानामुळे भारतीय हवाई दलाची एका चांगल्या विमानाची तीन दशकांची प्रतीक्षा संपली आहे. भारत सरकारचे प्रिन्सिपल सायन्टिफिक ऍडव्हायजर आर. एस. राघवन यांनीही तेजस मधून उड्डाण केले. 

भारतीय बनावटीच्या तेजस हे हलक्या जातीचे विमान भारतीय बनावटीच्या तेजस हे हलक्या जातीचे विमान आहे. १९८० पासून या विमानाची निर्मिती करण्यात येत आहे.  एरो इंडिया 2019 या प्रदर्शनात  एफओसी सर्टिफिकेट अँड रिलीज टू सर्व्हिस डॉक्युमेंट (आरएसडी) हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मशाल बी. एस. धानोआ यांना सुपूर्त करण्यात आले.  

भारतीय हवाई दलाने वेळोवेळी सुचविलेले बदल तेजसमध्ये  करण्यात आले आहेतनिर्मितीपासून सुमारे तीन दशकांनी हवाई दलात समाविष्ट होण्यास सज्ज झालेल्या तेजस विमानांचा विलंब हा चिंतेचा विषय होता. तेजस या विमानाने हवाई दलाच्या नुकत्याच झालेल्या वायुशक्ती युध्दसरावात भाग घेतला होता. ते युध्दसुसज्ज झाले असले, तरी त्यास त्रयस्थ यंत्रणेचा अंतिम उड्डाणपरवाना बाकी होता. सेन्टर फॉर मिलिटरी एअरवर्दीनेस एन्ड सर्टिफिकेशन या संस्थेने तो दिल्याचे बुधवारी जाहीर केले होते. भारतीय हवाई दलाने वेळोवेळी सुचविलेले बदल तेजसमध्ये  करण्यात आले आहे. आता त्या बदलांवर त्रयस्थ यंत्रणेकडून शिक्कामोर्तब झाले व परवाना  मिळाला, असे एका चाचणी करणाऱ्या वैमानिकाने सांगितले

टॅग्स :airforceहवाईदलBipin Rawatबिपीन रावतfighter jetलढाऊ विमान