पास करतो म्हणून शिक्षकाने विद्याथिर्नीकडे केली शरीर सुखाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 13:52 IST2018-05-02T13:47:16+5:302018-05-02T13:52:06+5:30

शिक्षणाचे माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यात शिक्षिकीपेक्षाला काळीमा फासणारी घटना समाेर अाली अाहे. एका शिक्षकाने पास करताे म्हणत विद्यार्थीनीकडे चक्क शरीर सुखाची मागणी केल्याची घटना घडली अाहे.

teacher asked student to satisfy him to get pass in exam | पास करतो म्हणून शिक्षकाने विद्याथिर्नीकडे केली शरीर सुखाची मागणी

पास करतो म्हणून शिक्षकाने विद्याथिर्नीकडे केली शरीर सुखाची मागणी

पुणे : शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना पुण्यात समोर आली आहे. पुण्यातील एका महाविद्यालयातील शिक्षकाने आपल्या विद्याथिर्नीकडे पास करण्यासाठी शरीर सुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिक्षक संदीप कांबळे (रा. वडगाव धायरी) याच्यावर हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी एफ.वाय बी. ए वर्गात शिकणाऱ्या विद्याथिर्नीने फिर्याद दिली आहे़  विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीनुसार संदीप कांबळे हा विद्याथिर्नीला फोन करुन तुला पास करतो त्या बदल्यात काय देशील असे विचारु लागला. यावर मुलीने फोन बंद केला असता. काही दिवसांनी पुन्हा फोन करत पास होण्यासाठी शरीर सुखाची मागणी केली. याला मुलीने नकार दिला असता तुला पास व्हायचे असेल तर तुला माझ्यासोबत लॉजवर यावे लागेल असे सांगितले. वारंवार येणाऱ्या या फोननंतर त्या विद्यार्थीनीने त्याचा फोन रेकॉर्ड केला.

त्यानंतर तिने घटना आई-वडिलांना सांगितली. तसेच या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास हवेली पोलीस करीत आहेत. 

Web Title: teacher asked student to satisfy him to get pass in exam