शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

पुणे शहरातील सहा मीटर रस्त्यावर " टीडीआर" मुळे निर्माण होऊ शकतो वाहतुकीचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 10:19 PM

सर्वच रस्ते नऊ मीटर करण्याच्या निर्णयाला नुकतीच मुंबईत पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्थगिती

ठळक मुद्देजुने वाडे-इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न  पालिकेच्या सर्वच रस्ते नऊ मीटर करण्याच्या निर्णयाचे बांधकाम व्यावसायिकांकडून स्वागत

पुणे : शहरातील सहा मिटरच्या रस्त्यांवर टीडीआर वापराला परवानगी देण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत दिले. परंतु, २०१६ साली जेव्हा या रस्त्यांवर टीडीआर वापराला बंदी करण्यात आली तेव्हा वाहतुक कोंडीचा विचार प्रामुख्याने करण्यात आला होता. छोट्या रस्त्यांवर अधिक टीडीआर वापरल्यास भविष्यात वाहतुकीचा प्रश्न जटील होण्याची शक्यता गृहीत धरून या आदेशात नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यावर टीडीआर वापरू नये असा मुद्दा समाविष्ट करण्यात आला होता.

शहरातील सर्व रस्ते नऊ मीटर करण्याचा ठराव स्थायी समितीने मंजूर केला असून त्यावर हरकती आणि सूचना या मागविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पालिका प्रशासनाने सुरुवातीला शहरातील केवळ ३२३ रस्ते नऊ मीटर करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. विरोधी पक्षांकडून झालेल्या विरोधाच्या आणि त्यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्या घेतलेल्या भेटीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने सर्वच रस्ते नऊ मीटर करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला नुकतीच मुंबईत पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्थगिती देण्यात आली आहे.

एकीकडे पालिकेच्या निर्णयाचे बांधकाम व्यावसायिकांकडून स्वागत करण्यात येत असतानाच विरोधी पक्षाच्या रेट्यामुळे या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. तत्कालीन सरकारने २०१६ साली टीडीआर नियमावली आणली. या नियमावलीत नऊ मीटर पेक्षा कमी रुंदी असलेल्या रस्त्यावर टीडीआर वापरला जाऊ नये असे नमूद करण्यात आलेले होते. छोट्या रस्त्यांवर उंचच उंच इमारती उभ्या राहतील. त्या प्रमाणात नागरीकरण वाढणार आणि वाहनेही वाढणार. त्यामुळे रस्त्यावर पार्किंग वाढणे, त्यामुळे अपघात व वाहतूक कोंडी होणे असे प्रकार घडतील हा विचार करून सहा मीटर रुंदीच्या रस्त्यांवरील टीडीआरला मनाई करण्यात आली होती. त्यामुळे हा टीडीआर वापरणे बंद झाले. त्यामुळे अनेक वाडे, जुन्या इमारती यांच्यासह शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांमधील पुनर्विकास रखडला.

बांधकाम व्यवसायिक टीडीआर वापरण्यास परवानगी मिळत नसल्याने हे प्रोजेक्ट घेत नव्हते. पालिकेचे दिवसेंदिवस घटत चाललेले उत्पन्न, उत्पन्नाचे मर्यादित स्रोत यामुळे अडचणी उभ्या राहत आहेत. जर या रस्त्यांवर टीडीआर वापरता येत नसेल तर हे रस्तेच मोठे करून त्यातून उत्पन्न वाढविण्याची शक्कल प्रशासनाने लढविली होती. परंतु, या निर्णयाला तत्वत: स्थगिती आल्याने अडचणीत भरच पडली. या निर्णयाला स्थगिती देताना सहा मीटर रस्त्यावर टीडीआर वापरण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आल्यामुळे पालिकेला बांधकाम शुल्कामधून उत्पन्न मिळणार आहेत. परंतु, वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न मिटणार का हा कळीचा मुद्दा आहे.  

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाAjit Pawarअजित पवारTrafficवाहतूक कोंडीBJPभाजपा