शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

हॉर्नवर बोलू काही.....! विविध उपक्रमांतून होणार नो हॉर्नचा जागर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 15:28 IST

येता जाता हॉर्न कशाला... दुसऱ्यांना त्रास कशाला... हानी होते दुसऱ्याची..या जिंगलची शब्दरचना प्रसिध्द कवी संदीप खरे यांची असून सलील कुलकर्णी यांच्या आवाजात स्वरबध्द करण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रादेशिक परिवहन विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी नो हॉर्नवर प्रतिज्ञा तयारनो हॉर्नचा संदेश पोहचविण्यासाठी ही प्रतिज्ञा नो हॉर्न डे दिवशी अनेक शाळांमध्ये केली जाणार

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालय व शहर वाहतुक पोलिसांच्या वतीने पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून नो हॉर्न डे साजरा केला जाणार आहे. विविध शैक्षणिक व सामाजिक संघटनांचाही दि. १२ सप्टेंबर रोजी सक्रिय सहभाग असेल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिली. नो हॉर्न डे मोहिमेचा कृती आराखडा ठरविण्यासाठी सोमवारी (दि. १०) परिवहन कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीस विविध सासकीय विभागांचे अधिकारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, सेवा संस्थांचे पदाधिकारी, वाहतुकदार संघटना व मोटार ड्रायव्हिंग स्कुलचे प्रतिनिधी उपस्थित होते. दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर कुलगुरू नितीन करमळकर यांच्या हस्ते नो हॉर्न डे ची सुरूवात केली जाईल. तसेच सकाळी १० वाजता एमआयटी संस्थेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता पिंपरी येथे विविध कार्यक्रम होतील. तसेच दोन्ही शहरांतील विविध चौकांमध्ये जनजागृती केली जाईल. नवचैतन्य हास्यपरिवार संस्थेतर्फे ६० पेट्रोल पंपांवर नो हॉर्नची पत्रके व स्टीकर्सचे वाटप केले जाईल. नागरिकांच्या हातात नो हॉनचा संदेश देणारी बँडही बांधली जातील. विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नो हॉर्नची शपथही दिली जाणार असल्याचे आजरी यांनी सांगितले................................हॉर्नवर बोलू काही...येता जाता हॉर्न कशाला... दुसऱ्यांना त्रास कशाला... हानी होते दुसऱ्याची... स्वत: देखील धोक्याची... सुज्ञपणाने वागुया... शांतीमय जग बनवुया अशी शब्दरचना असलेल्या जिंगलद्वारे प्रादेशिक परिवहन विभागाकडून नो हॉर्नबाबत जनजागृती केली जात आहे. प्रसिध्द कवी संदीप खरे यांची गीतरचना असून सलील कुलकर्णी यांच्या आवाजात स्वरबध्द करण्यात आली आहे. दि. १२ सप्टेंबरपासून हॉर्नबाजी कायमची बंद करण्याचा निर्धार करूया, असे आवाहन यात करण्यात आले आहे. -----------------विद्यार्थ्यांसाठी प्रतिज्ञा प्रादेशिक परिवहन विभागाने विद्यार्थ्यांसाठी नो हॉर्नवर प्रतिज्ञा तयार केली आहे. पुणे माझे शहर आहे माझ्या पर्यावरणाचे संवर्धन करणे माझे कर्तव्य आहे अशी प्रतिज्ञाची सुरूवात आहे. तर माझ्या पालकांनी हॉर्नचा वापर करू नये यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन असा प्रतिज्ञेचा शेवट आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत नो हॉर्नचा संदेश पोहचविण्यासाठी ही प्रतिज्ञा नो हॉर्न डे दिवशी अनेक शाळांमध्ये केली जाणार आहे.

टॅग्स :Puneपुणेpollutionप्रदूषणtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरHealthआरोग्यRto officeआरटीओ ऑफीस