आरोग्याची काळजी घेताना जगण्याची अडचण होऊ नये; पुण्यात प्रशासनाच्या काही निर्बंधांना भाजपचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 14:29 IST2021-04-02T14:21:28+5:302021-04-02T14:29:40+5:30
पोलिसांनी कुणाचीही अडवणूक न करता तारतम्याने वागावे.

आरोग्याची काळजी घेताना जगण्याची अडचण होऊ नये; पुण्यात प्रशासनाच्या काही निर्बंधांना भाजपचा विरोध
पुणे : पुणे शहरात झपाट्याने कोरोना रुग्ण वाढत आहे ही चिंताजनक बाब आहे. अशा परिस्थितीत काही कडक पावले उचलणे आवश्यक आहे. मात्र, आरोग्याची काळजी घेताना जगण्याची अडचण होता कामा नये. त्यामुळे प्रशासनाच्या काही निर्बंधांना आमचा विरोध आहे असे मत पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले आहे.
पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर नव्याने काही बंधने जाहीर करण्यात आली आहेत.त्यातील काही निर्बंधांना भाजपने विरोध दर्शविला आहे.
खासदार गिरीश बापट म्हणाले, कामावरून उशिरा घरी जाणाऱ्यांना
पोलिसांनी मारहाण करता नये.त्यांच्याशी पोलीस प्रशासनाने सहकार्याची भूमिका घ्यावी. कुणाचीही अडवणूक न करता त्यांनी तारतम्याने वागावे ही अपेक्षा आहे. पीएमपी सुरु ठेवायचा निर्णय पालिकेतुन आदेश देेणार आहोत.
शहरात बेडची संख्या वाढवणे गरजेचे असून एमबीबीएस विद्यार्थी, रिटायर्ड डॉक्टर यांनी देखील कोरोना संकटाशी सुरू असलेल्या लढाईत सहभागी व्हावेत.
आरोग्याची काळजी घेताना जगण्याची अडचण होता कामा नये.त्यामुळे आहे त्याप्रमाणे आठनंतर संचारबंदी कायम सुरू ठेवावी अशी आमची भूमिका होती. दिवसभर जमावबंदी असावी असेही बापट यांनी यावेळी सांगितले.
हॅाटेल पूर्णपणे बंद ठेवण्याच्या भूमिकेला आमचा विरोध आहे. जर लोक बसून गप्पा मारतात तर उभं राहुन जेवायला परवानगी द्या असे बापट म्हणाले.