पुणे : शहरात गॅस सिलिंडरचा कोणत्याही प्रकारे काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर तत्काळ कडक कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना महापौर मंजूषा नागपुरे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रशासनाला दिल्या.
गॅस पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेताना त्यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शहरातील परिस्थितीची माहिती घेतली. महापौर नागपुरे यांनी घेतलेल्या आढाव्यानुसार पुणे शहरात गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू असून, दररोज सुमारे दहा हजार सिलिंडरचे वितरण नियमितपणे करण्यात येत आहे. शहरातील सुमारे ८५ टक्के सिलिंडर बुकिंग ओटीपी प्रणालीद्वारे होत असून, गॅस कंपन्यांकडून २५ दिवसांच्या नियमानुसार वेळेत डिलिव्हरी दिली जात आहे. गॅस वितरण कंपन्यांच्या समन्वयातून नागरिकांना नियमितपणे गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यात येत असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच घाबरून जाऊन सिलिंडरची अनावश्यक साठेबाजी करू नये, असे आवाहनही नागपुरे यांनी केले.
Web Summary : Pune's Mayor directed strict action against gas cylinder black marketing. Supply is smooth, with 10,000 cylinders distributed daily. Citizens should avoid hoarding and trust rumors.
Web Summary : पुणे की महापौर ने गैस सिलेंडर की कालाबाजारी पर सख्त कार्रवाई के निर्देश दिए। आपूर्ति सुचारू है, प्रतिदिन 10,000 सिलेंडर वितरित किए जा रहे हैं। नागरिक जमाखोरी से बचें और अफवाहों पर विश्वास न करें।