शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूमध्ये 'खेला'! अभिनेता विजयच्या पक्षाची मुसंडी; द्रमुकला धक्का
2
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
3
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
4
बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
5
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
6
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
7
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
8
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
9
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
10
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
11
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
12
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
13
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
14
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
15
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
16
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
17
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
18
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
19
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
20
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तडीपार गुंडाचा पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर तडीपार गुंडाने कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर तडीपार गुंडाने कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने सावध असलेल्या पोलिसांनी हा हल्ला चुकविला. पोलीस उपनिरीक्षकांसमवेत असलेल्या पोलिसांना वीट मारली.

याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी कुमार भागवत चव्हाण याला अटक केली आहे. तर सराईत गुन्हेगार प्रतीक पृथ्वीराज कांबळे (दोघेही रा. मंगळवार पेठ) याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नरेश केशव वाडेवाले यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवार पेठेतील सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ रविवारी सायंकाळी ५ वाजता घडली. प्रतीक कांबळे याला तडीपार करण्यात आले आहे.

मंगळवार पेठेत लावलेले शासकीय कॅमेरे आरोपींनी हलविले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांना ताब्यात घेण्यासाठी वाडेवाले व त्यांचे सहकारी मंगळवार पेठेत गेले होते. तेथे आरोपी रिक्षात बसले होते. त्यावेळी प्रतीक कांबळे याने वाडेवाले यांना मला पकडतो का, मी आता तुला जिवंत सोडत नाही, असे म्हणून हातातील कोयत्याने त्यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वाडेवाले मागे सरकले. आरोपी कुमार चव्हाण याने वीट उचलून वाडेवाले यांच्याबरोबर असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना मारली. त्यांनी कुमार चव्हाण याला पकडले. तोपर्यंत प्रतीक कांबळे हा पळून गेला.

फरासखाना पोलिसांनी दोघांवर खुनाचा प्रयत्न करणे व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे़.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले यांनी सांगितले की, तेथील कॅमेरे हलविल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आम्ही मंगळवार पेठेतील बुद्ध विहाराजवळ आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलो होतो. तेवढ्यात तडीपार गुंड प्रतीक कांबळे हा हातात कोयता घेऊन धावत आला. आम्ही सावध असल्याने त्याचा वार चुकविला. तेव्हा तो कोयत्याचा धाक दाखवत पळून गेला. आम्ही कुमार चव्हाण याला ताब्यात घेतले. चव्हाण याला न्यायालयात हजर केले. सरकारी वकील किरण बेंडभर यांनी तडीपार गुंड कांबळे याला पकडायचे आहे. यांनी कोयता का बाळगला होता, याचा तपास करायचा आहे, असे सांगितले. न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली.