शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

तबलिगी जमातने तोबानामा (माफीनामा) जाहीर करावा: मुस्लिम सत्यशोधक मंडळाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 3:38 PM

तबलिगीच्या असंवेदनशील वर्तनाबद्दल मुस्लिम समाजातूनही असंतोष व्यक्त करण्यात येत आहे..

ठळक मुद्देमुस्लिम समाजात संशय आणि भीतीचे वातावरण निर्माण

पुणे : तबलिगीला ट्रिटमेंट कसली देताय, त्यांना गोळ्या घाला, लॉकडाउन संपल्यानंतर गाठ आमच्याशी आहे; असे वक्तव्य  मनसेचे नेते राज ठाकरे यांनी केल्यामुळे मुस्लिम समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सर्वसामान्य मुस्लिमांची असुरक्षितता वाढत असतानाच कोरोनाग्रस्तांची संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या तबलिगी जमातने ताबडतोब तोबानामा(माफीनामा) करुन संपूर्ण भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी मुस्लीम सत्यशोधक मंडळाने केली आहे.यांसंदर्भात मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दिन तांबोळी म्हणाले,दिल्लीच्या निजामुद्दिन, मरकजमध्ये तबलिगी जमातचा कर्तव्य पालनातील अधर्म दिवसेंदिवस पुढे  येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येस तबलिगी जमातचा बेजबबादारपणा कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला आहे. तबलिगीच्या असंवेदनशील वर्तनाबद्दल मुस्लिम समाजातूनही असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. यातच तबलिगीच्या वर्तनाचा समाचार घेत भारतातील धार्मिक तेढ वाढवण्यास कारणीभूत ठरेल असा मजकूर सोशल मीडियात फिरत असल्याामुळे समाजात संशय आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.मुख्यमंत्री मा. उघ्दवजी ठाकरे यांनी अशा खोट्या बनावट पोस्ट टाकणा-यांविरोधात कडक  कारवाई करण्याचा इशारा दिला तसेच  पोलीस ठाण्यात काही गुन्हेही नोंदवण्यात आले. त्यामुळे समाजाला अनामिक भीतीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे पुन:श्च मुस्लिम समाजात भीती निर्माण झाली आहे.येत्या बुधवारी (8 एप्रिल) शब्बे बारात आहे. या निमित्त लोक मस्जिद मध्येनमाज आदा करतात आणि कबरस्थानात जाऊन प्रार्थना करीत असतात. पंधरा दिवसावर रमजान महिना सूरु होत आहे. मुस्लिम समाजात रमजानला फार महत्व असते.महिनाभर उपास, नमाज, कुराण पठण केले जाते. ईदगाहवर जाऊन  सामुदायिक नमाज अदा करण्याबरोबरच आप्तस्वकीय आणि समाजबांधवाना गळाभेट - अलिंगन दिले जाते. हे सर्व  कोरोना विषाणू पसरवण्यात आणि ग्रस्तांची संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरु शकतात. मानवतेसमोरील या संकटास प्रतिबंध करण्यासाठी सर्व धार्मिक सण आणि श्रद्धा आपल्या घराच्या चार भिंतीच्या आत मर्यादित ठेवावेत.  शासन, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचा आदर करुन सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन डॉ. तांबोळी यांनी केले आहे.-------------------------------------------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेMuslimमुस्लीमdelhiदिल्लीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे