शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णालयातही उपलब्ध होणार ‘सिरप’

By admin | Updated: February 24, 2015 23:10 IST

नवीन वर्षात आतापर्यंत जिल्ह्यात स्वाइन फ्लूने सहा जणांचा बळी घेतला असून, जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. जिल्ह्यात टॅमी फ्लूचा

पुणे : नवीन वर्षात आतापर्यंत जिल्ह्यात स्वाइन फ्लूने सहा जणांचा बळी घेतला असून, जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. जिल्ह्यात टॅमी फ्लूचा आवश्यक साठा असून, लहान मुलांसाठी ‘सिरप’ उपलब्ध करून देऊ, असे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एन. डी. देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी देशमुख यांच्याकडून स्वाइन फ्लूबाबतच्या उपाययोजनांची माहिती घेऊन आवश्यक उपाययोजना तातडीने करा, अशा सूचना आज दिल्या. त्यानुसार हे सायरस सिरप उपलब्ध करून देण्याचे देशमुख यांनी सांगितले. खासगी संस्थेकडून हे सिरप विकत घेणार असून साधारण २०० बाटल्या पहिल्या टप्प्यात घेणार असल्याचे ते म्हणाले. यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यात काही प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यात जिल्हास्तरावर वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक, प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे प्रशिक्षण सुरू आहे. तालुकास्तरावर सर्व आरोग्य कर्मचारी व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचेही प्रशिक्षण घेतले जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात ४९९६ ताप, सर्दी व खोकलासदृश रुग्णांची तपासणी करण्यात आल्याचे आरोग्य प्रशासनाने सांगितले. जिल्हा परिषदेशी संबंधित तालुक्यातील सर्व विभागांत कार्यशाळा घेतल्या जाणार असून तेथे दक्षतेबाबात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा, अंगणवाड्या व आशांना याबाबत माहिती दिली जाणार आहे. यामुळे स्वाइन फ्लूबाबत घ्यावयाच्या काळजीबाबात दुर्गम भागात माहिती पोहोचविली जाणार आहे. पुढील दोन दिवसांत जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षांच्या उपस्थितीत एक आढावा बैठकही घेतली जाणार आहे. यामध्ये जिल्हा आरोग्य विभागत उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती देणार आहे. (प्रतिनिधी)