"तलवारीने केक कापण्याचा स्टेट्स ठेवला, पोलिसांनी ताब्यात घेऊन पाहुणचार केला"
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 19:13 IST2021-07-25T19:13:23+5:302021-07-25T19:13:30+5:30
दोन गुंडांना तलवारीसहित केले अटक

"तलवारीने केक कापण्याचा स्टेट्स ठेवला, पोलिसांनी ताब्यात घेऊन पाहुणचार केला"
पुणे : सराईत गुन्हेगार रोहन घोलप याने हातात तलवार घेऊन केक कापतानाचा व्हॉटसअप ठेवल्याची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला पकडून पाहुणचार केला. तलवार, कोयता, चाकू बनविणारे व शस्त्र जवळ बाळगणारे यांच्याविरोधात विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले होते.
पोलीस अंमलदार अजय थोरात यांना माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार अखिल देशमुख याने हातात तलवार घेऊन केक कापतानाचे व्हॉटसॲपवर स्टेटस ठेवले आहे. तो तलवारीसह सूर्या हॉस्पिटलजवळ थांबला आहे. यावरून पोलिसांनी तेथे जाऊन अखिल ऊर्फ गणेश विलास देशमुख (वय ३०, रा. कसबा पेठ) याला ताब्यात घेतले.
पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना माहिती मिळाली की, रोहन घोलप याने हातात तलवार घेऊन व्हॉटसॲपवर स्टेटस ठेवले आहे. तो तलवारीसह झेड ब्रिजवर थांबला आहे. या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे जाऊन रोहन रमेश घोलप (वय २१, रा. गोखलेनगर) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रोहन घोलप याने हातात तलवार घेऊन वॉट्स ॲपवर स्टेटस ठेवले असून तो तलवार सह झेड ब्रिजवर डेक्कन पुणे येथे थांबला आहे. त्यानुसार सापळा रचून रोहन रमेश घोलप (वय २१ रा. गोखले नगर) पुणे यास ताब्यात घेतले आहे.