शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

नगरमधील महिलेचा स्वाइन फ्लूने पुण्यात मृत्यू

By admin | Updated: January 25, 2015 00:16 IST

स्वाइन फ्लूमुळे शहरात शनिवारी आणखी एका महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे या नव्या वर्षातील स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या ४ वर पोहोचली आहे.

पुणे : स्वाइन फ्लूमुळे शहरात शनिवारी आणखी एका महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे या नव्या वर्षातील स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या ४ वर पोहोचली आहे. ही महिला अहमदनगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील रहिवासी आहे. दरम्यान, शहरात स्वाइन फ्लूची तीव्रता वाढली असून, लागण झालेल्या ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे.संबंधित महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर २३ जानेवारीला त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. शनिवारी सकाळी आलेल्या तपासणी अहवालात त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले होते. स्वाइन फ्लूबरोबर त्यांना डेंगीची लागण झाल्याचेही निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती आणि उपचार सुरू असताना आज दुपारी सव्वातीनच्या सुमारास या महिलेचा मृत्यू झाला. थंड वातावरण एच१ एन१ विषाणूंच्या वाढीसाठी पोषक असते. गेले आठ महिने हे वातावरण नसल्याने या काळात एकही रुग्ण सापडला नव्हता. मात्र, शहरात थंडी वाढल्यानंतर स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळत आहेत. हवामान बदलामुळे सर्दी-खोकला, घसादुखी, ताप आदी व्हायरल इन्फेक्शनमध्येही वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)दिवसभरात ५३३ जणांची तपासणी करण्यात आली. यापैकी ४५ संशयितांना टॅमीफ्लू औषधे देण्यात आली. दिवसभरात स्वाइन फ्लूचे ३ नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे या महिन्यातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या १४ वर पोहोचली आहे. या महिन्यात स्वाइन फ्लूने ४ जणांचा मृत्यू झाला. त्यापैैकी तिघे जण पुणे शहराबाहेरील होते.