स्वारगेट घटनेतील आरोपीला चौकात फाशी द्या; सुप्रिया सुळेंचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 15:49 IST2025-03-03T15:49:10+5:302025-03-03T15:49:23+5:30

तिने पैसे घेतलेले होते इतक्या संवेदनशील केसमध्ये आरोपीला मदत होईल अशी वक्तव्य करणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? हे धक्कादायक आहे

Swargate st stand accused in death penalty said Supriya Sule | स्वारगेट घटनेतील आरोपीला चौकात फाशी द्या; सुप्रिया सुळेंचा संताप

स्वारगेट घटनेतील आरोपीला चौकात फाशी द्या; सुप्रिया सुळेंचा संताप

पुणे : स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीला धमकावून दत्तात्रय रामदास गाडे या नराधमाने तिच्यावर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २५) सकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. गाडे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने त्याला पोलिसांच्या कामकाजाबाबत माहिती असल्याने तो पोलिसांना गुंगारा देत असल्याची चर्चा शहरात होती. घटनेनंतर आरोपी शिरुरमध्ये लपून बसल्याची माहिती समोर आली.  त्यांनतर त्याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा, तसेच स्वारगेट पोलिसांनी १३ पथके शिरूरला रवाना झाली. 

अखेर ७२ तासांच्या कालावधीनंतर गाडेला शोधण्यात यश आले. आता या नराधमावर लवकरात लवकर कारवाई करत कठोर शिक्षा करावी अशी मागणी सर्व स्तरावरून होत आहे. अशातच खासदार सुप्रिया सुळे यांनीसुद्धा या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. फास्ट ट्रक कोर्टात केस चालवून चौकात फाशी दिली पाहिजे असं त्या म्हणाल्या आहेत. आज सुप्रिया सुळे यांनी स्वारगेट बसस्थानकाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला

सुळे म्हणाल्या, स्वारगेटची ही जी घटना झाली त्याला ज्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केलाय ते खूप दुर्दैवी आहे. आणि मी इथे आल्यावर बघितलं की इथून मुख्य रस्ता तर म्हणजे पन्नास पावलावर पण नाही, पंचवीस पावलावरच आहे. पोलीस स्टेशन पण जवळच आहे. त्यामुळे ही जी घटना झाली ती फार कुठे अंधारात, कोपऱ्यात वगैरे अशी झालेली नाही. त्या बिचाऱ्या मुलीला प्रचंड भीती दाखवली गेली. आणि आपण सगळे असल्या कुठल्याही महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा एक समाज म्हणून आपण जाहीर निषेध केला पाहिजे. मी अनेक वेळा सत्ताधाऱ्यांना जेव्हा बदलापूरची घटना झाली. तेव्हाही विनंती केली होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री हे तेव्हाही होते आणि आजही आहेत. त्यांना विनम्रपणे विनंती करते की महाराष्ट्रानी देशाला एक उदाहरण द्यावं की फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून अशा लोकांना चौकात फाशी दिली पाहिजे हे माझं मत आहे.

या या घटनेचं या घटनेची माध्यमांना माहिती देताना  इथल्या झोनचे चे डिसिपी जे आहेत त्यांनी सुरुवातीला असं म्हटलं होतं की, या महिलेनं आरडाओरडा केला नाही. त्यांच्याच राज्याचे गृहराज्यमंत्री असं म्हणतात की, तिने आरडाओरडा केला नाही. त्यांच्याकडून चुकीचं वक्तव्य केली जात आहेत. केसला वेगळं वळण देण्याचा प्रयन्त केला जातोय. तिने पैसे घेतलेले होते. या सगळ्या गोष्टींकडं तुम्ही कसं पाहताय? या इतक्या संवेदनशील केसमध्ये पोलिसांनी अशा पद्धतीनं आरोपीला मदत होईल अशी वक्तव्य करणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? हे धक्कादायक आहे ह्याचा मी जाहीर निषेध करते. आणि महाराष्ट्राच्या सरकारला एक प्रश्न विचारते, अतिशय प्रांजळपणे की तुम्ही लाडकी बहीण एवढं तुम्ही बोलता मग ह्या केसमध्ये जे काही स्टेटमेंट सरकारकडून आले. हे योग्य आहेत. कुणाच्या तरी घराची इथली मुलगी होती. असं सुळे म्हणाल्या आहेत. 

Web Title: Swargate st stand accused in death penalty said Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.