शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

उपमुख्यमंत्र्यांच्या गावातील 'त्या' तलाठ्याचे अखेर निलंबन; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2021 8:24 PM

काटेवाडी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गाव आहे. त्यामुळे हा सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

बारामती: काटेवाडी(ता.बारामती) येथील तलाठ्याने  विहिरीची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठ्याने शेतकऱ्याला लाच मगितल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अनुषंगाने बारामतीचे तहसिलदार विजय पाटील यांनी संबंधित व्हिडीओची पाहणी करीत तलाठ्यावर चौकशी होईपर्यंत निलंबनाची कारवाई केली आहे. 

गावातील तलाठी महेश मेटे यांनी शेतकऱ्याकडे २० हजारांची मागणी केल्याचा व्हिडीओ  व्हायरल झाला आहे.  विकास धायगुडे हे आपल्याला विहिरीची नोंद सातबाऱ्यावर व्हावी यासाठी तलाठी ऑफिसला खेटे मारत होते. परंतु तलाठी मेटे यांनी त्यांच्याकडे २० हजारांची मागणी केली. त्याबदल्यात विकास धायगुडे यांनी तलाठी मेटेंना विहिरीची नोंद सातबाऱ्यावर व्हावी यासाठी १० हजार रुपये दिले , त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओमध्ये तलाठी पैसे मोजताना दिसत आहेत. तसेच मला वरही पैसे द्यावे लागतात, पण ठीक आहे .मी करून घेतो असा संवाद ऐकु येत आहे.

काटेवाडी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गाव आहे. त्यामुळे हा सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.  प्रशासनामध्ये  उपमुख्यमंत्र्यांचा मोठा दरारा आहे.  परंतु त्यांच्याच गावातील तलाठ्याने  लाच घेतल्याने त्यामुळे हा सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.  

तहसिलदार विजय पाटील यांनी सांगितले कि, काटेवाडी येथील तलाठ्याचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. त्या अनुषंगाने व्हीडीओची प्राथमिक तपासणी करण्यात आली.यामध्ये काही संशयास्पद  बाबी आढळल्या.व्हीडीओतील चित्रीकरणाच्या अनुषंगाने  तलाठ्यांना विचारणा केली. यामध्ये नोंदीच्या बाबत जे कामकाज होणार होते, प्रथमदर्शनी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणुक नियमाचा भंग केल्याचे दिसत असल्याने तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विभागीय चौकशीचा प्रस्ताव प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याक डे पाठविण्यात आला आहे.त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसिलदार पाटील यांनी सांगितले.————————————

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारCorruptionभ्रष्टाचारFarmerशेतकरीSocial Mediaसोशल मीडिया