५० हजारांच्या लाचप्रकरणी निलंबित पोलीस निरीक्षकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 13:18 IST2021-03-23T04:13:29+5:302021-03-23T13:18:23+5:30

पुणे : न्यायाधीशांना मॅनेज करून फौजदारी खटला रद्द करण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचप्रकरणात आज निलंबित पोलीस निरीक्षक अनिल ऊर्फ ...

Suspended police inspector arrested in Rs 50,000 bribery case | ५० हजारांच्या लाचप्रकरणी निलंबित पोलीस निरीक्षकाला अटक

५० हजारांच्या लाचप्रकरणी निलंबित पोलीस निरीक्षकाला अटक

पुणे : न्यायाधीशांना मॅनेज करून फौजदारी खटला रद्द करण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचप्रकरणात आज निलंबित पोलीस निरीक्षक अनिल ऊर्फ भानुदास जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यांना उद्या मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

या प्रकरणात खासगी महिला एस. भालचंद्र गायकवाड (वय २९) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५० हजार रुपयांची लाच घेताना १४ जानेवारी रोजी अटक केली होती. त्यानंतर या गुन्ह्यात महिला न्यायाधीश यांचादेखील समावेश असल्याचे निष्पन्न झाले होते.

या प्रकरणाचा तपास सुरु असताना वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांना निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने आज त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक मेहेंदळे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Suspended police inspector arrested in Rs 50,000 bribery case