Suspected death of young man in IT company at Hinjawadi | हिंजवडीत आय टी कंपनीत तरुणाचा संशयास्पद मृत्यू 
हिंजवडीत आय टी कंपनीत तरुणाचा संशयास्पद मृत्यू 

पुणे : हिंजवडी येथील आय टी कंपनीतील कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला आहे. प्रथमदर्शनी विचित्र पद्धतीने झालेला हा प्रकार बघता संबंधित व्यक्तीचा खून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

 याबाबत अधिक माहिती अशी ही, हिंजवडी येथील फेज थ्री मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) नावाची कंपनी आहे. या कंपनीत काम करणारे कपिल गणपत विटकर (वय ४०, राहणार : वडाची वाडी, उंड्री ) हे तिसऱ्या मजल्यावर काम करत होते. ते कामानिमित्त सहाव्या मजल्यावर गेले. मात्र बराच वेळ खाली न आल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यात त्यांचा गळा प्लास्टिक टॅपने आवळण्यात आलेला आढळला. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांना बोलावण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे. सध्या ससून रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन सुरु आहे. 

 दरम्यान घटना घडलेल्या सहाव्या मजल्यावरही कर्मचारी काम करतात. त्यामुळे इतकी मोठी घटना कोणाच्याही लक्षात कशी आली नाही आणि संबंधित मजल्यावर सुरक्षा व्यवस्था आहे का, सीसीटीव्ही फुटेज आहे का यासह विविध बारकाव्यांचा तपास पोलीस करत आहेत. 

Web Title: Suspected death of young man in IT company at Hinjawadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.