suspected accused innocent freedom from katil Siddiqui murder case | कातिल सिद्दीकी खून प्रकरणी संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता
कातिल सिद्दीकी खून प्रकरणी संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता

ठळक मुद्दे शिवाजीनगर न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी आरोपींना केले निर्दोष मुक्त केले

पुणे :संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकी याच्या खून प्रकरणी शरद मोहोळ आणि आलोक भालेराव यांची शिवाजीनगर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सिद्दीकी याचा ८ जून २०१२ रोजी येरवडा तुरुंगातील अंडा सेलमध्ये बर्मुड्याच्या नाडीने गळा आवळून खून करण्यात आला होता.
   याबाबत अधिक माहिती अशी की,शरद हिरामण मोहोळ आणि आलोक शिवाजीराव मोहोळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मोहोळ आणि भालेराव यांनी मिळून संशयित दहशतवादी मोहंमद कातिल मोहम्मद जाफर सिद्दीकी उर्फ सज्जन  (मूळ बिहार) याचा खून केला होता. या खटल्या दरम्यान साक्षी आणि उलट तपासणी घेण्यात आली होती. अखेर शिवाजीनगर न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी  त्यांना निर्दोष मुक्त केले आहे.
कातिल सिद्दीकी हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न करणारा संशयित दहशतवादी होता. तो इंडियन मुजाहिदीचा दहशतवादी असल्याचे एटीएसच्या तपासात पुढे आले आहे. मोहोळ याच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तो एक सराईत गुन्हेगार असून खून, खुनाचा प्रयत्न खंडणी असे गुन्हे दाखल आहेत.


Web Title: suspected accused innocent freedom from katil Siddiqui murder case
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.