शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
2
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
3
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
4
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
5
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
6
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
7
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
8
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
9
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
10
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
11
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
12
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
13
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
14
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
15
अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री
16
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
17
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
18
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
19
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
20
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?

स्वारगेट सहायक आयुक्तपदी सुषमा चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:15 AM

लोकमत न्यूज नेटवक पुणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वारगेट विभागाच्या सहायक पोलिस ...

लोकमत न्यूज नेटवक

पुणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वारगेट विभागाच्या सहायक पोलिस आयुक्तपदी सुषमा चव्हाण यांची नियुक्ती केली. आयुक्त गुप्ता यांनी चव्हाण यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या.

चव्हाण यांची १९८७ मध्ये पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. त्यांनी पुणे, मुंबई, नवी मुंबई, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे काम केले आहे. तसेच पुणे शहर आयुक्तालयात देखील त्यांनी एक सक्षम महिला अधिकारी म्हणून विश्रामबाग, फरासखाना, कोथरुड, डेक्कन, भोसरी, गुन्हेशाखेची धुरा सांभाळली. एकंदर पुणे शहराची चांगली ओळख असलेल्या अधिकार्‍यांत त्यांची वर्णी लागते.

त्यांच्या कामाची दखल घेत २००७ मध्ये पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह, २०१० मध्ये गुणवत्तापुर्वक सेवेसाठी राष्ट्रपतींचे पदक तसेच २०२० साली उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक प्राप्त झाले आहे. विविध गुन्ह्यांच्या तपास यासाठी त्यांना आत्तापर्यंत ४७५ बक्षिसे मिळालेली आहेत.