पुणे - बोपोडी येथील कृषी महाविद्यालयाच्या ताब्यातील सरकारी जमीन कुळांच्या नावे करण्याचा कारनामा करणाऱ्या निलंबित तहसीलदारांना अशा कामांची सवयच असल्याचे पोलिसांनी एफआयआरमध्ये नमूद केले होते. त्याचाच प्रत्यय सध्या येत आहे. सूर्यकांत येवले नायब तहसीलदार म्हणून दाखल झाल्यानंतर तहसीलदार पदावर पोहोचेपर्यंत त्यांचे तब्बल चार वेळा निलंबन झाले आहे. गडचिरोली, माण खटाव (सातारा), इंदापूर (पुणे) व सध्या पुणे याठिकाणी त्यांना निलंबित केले होते. त्यामुळे अशा अधिकाऱ्याला पुणे शहराचे तहसीलदारपद बहाल केले जाते आणि अशा प्रकारामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन बदनाम होते. यावरून अधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे, तर यामागे मोठा राजकीय हातही असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एफआयआरमध्ये उल्लेखबोपोडी येथील सुमारे १३ एकर जमीन कृषी महाविद्यालयाच्या ताब्यात आहे. ही जमीन १९५५ मध्ये रीतसर कृषी महाविद्यालयाच्या मालकीची असल्याचे सातबारा उताऱ्यावरून स्पष्ट होत आहे. मात्र, सूर्यकांत येवले यांनी ही जमीन विद्वांस यांच्या अर्जानंतर कुळाच्या नावे केली.याच प्रकरणावरून जिल्हा प्रशासनाने येवले यांच्या विरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला. या एफआयआरमध्ये येवले यांना अशा स्वरूपाचे कृत्य करण्याची सवयच असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी कशासाठी निलंबन झाले होते, याची माहिती दिली आहे.
Web Summary : Revenue officer Suryakant Yeole, suspended four times, faces accusations of land irregularities. An FIR alleges habitual misconduct, specifically regarding agricultural land allocation. Despite a history of suspensions in Gadchiroli, Satara, and Pune, Yeole's position raises concerns of political influence and administrative integrity within Pune district.
Web Summary : राजस्व अधिकारी सूर्यकांत येवले, चार बार निलंबित, भूमि अनियमितताओं के आरोपों का सामना कर रहे हैं। एक प्राथमिकी में आदतन दुराचार का आरोप लगाया गया है, विशेष रूप से कृषि भूमि आवंटन के संबंध में। गडचिरोली, सतारा और पुणे में निलंबन के बावजूद, येवले की स्थिति पुणे जिले में राजनीतिक प्रभाव और प्रशासनिक अखंडता की चिंता पैदा करती है।