शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान कालव्याच्या जागेचा वापर ठरविण्यासाठी सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 10:41 IST

- जलसंपदा विभागाकडून सल्लागार कंपनीची नेमणूक

पुणे : पाण्याचा अपव्यय टाळून त्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी जलसंपदा विभागाने खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान बोगद्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे सध्याचा कालवा बंद होणार असून त्याची सुमारे ३० किलोमीटर लांबी आणि सुमारे पाचशे मीटर ते एक किलोमीटर रुंदीच्या जागेचे सर्वेक्षण करून त्याचा वापर कसा करता येईल, यासाठी जलसंपदा विभागाने सर्वेक्षण सुरू केले आहे. या जागेचे काय करायचे, त्यातून विभागाला उत्पन्न कसे मिळेल आणि प्रकल्पासाठीचा खर्च कशा पद्धतीने उभा करता येईल, याबाबत अहवाल सादर करण्यासाठी एका सल्लागार कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे.

खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान सध्या बोगद्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सुमारे दीड हजार कोटींची ही योजना आहे. या योजनेमुळे सुमारे अडीच टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. दरम्यान प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर तो पूर्ण होण्यास किमान तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कालव्याची सुमारे ५०० मीटर ते एक किलोमीटर या रुंदीची जागा उपलब्ध होणार आहे. त्यातील काही भाग महापालिका व पीएमआरडीए हद्दीत येते. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे जागा हस्तांतरित करता येईल का, त्या माध्यमातून काही निधी उभारता येईल का, याची चाचपणी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते.

त्यानुसार महापालिकेने कालवा बंद केल्यानंतर नेमकी किती जागा उपलब्ध होऊ शकते. त्याच जागेचा काय वापर करता येईल, याचे सर्वेक्षण एका सल्लागार कंपनीची नियुक्ती करून केले होते. संबंधित सल्लागार कंपनीने खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान सुमारे ३० किलोमीटर लांबीच्या कालव्याचे सर्वेक्षण करून प्रारूप अहवाल महापालिकेकडे सादर केला आहे. आता जलसंपदा विभागाने स्वतंत्रपणे या जागेचे सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्यासाठी निविदा काढून सल्लागार कंपनीची नियुक्ती केली आहे. संबंधित सल्लागार कंपनीकडून लवकरच प्राप्त होईल, त्यानंतर त्या जागेबाबतचा निर्णय राज्य सरकारची मान्यता घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. कालवा बंद केल्यानंतर सुमारे ६५ लाख १९ हजार ४८५.४५ चौरस मीटर जागा उपलब्ध होऊ शकते. त्यापैकी ७ लाख ७७ हजार ३२९.९१ चौरस मीटर जागेवर अतिक्रमण झाले असल्याचे दिसून आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Survey to Decide Usage of Khadakwasla-Fursungi Canal Land

Web Summary : Water Resources Department surveys Khadakwasla-Fursungi canal land after tunnel construction. The 30km area, 500m-1km wide, will be assessed for revenue generation and project cost recovery. A consultant will submit a report for government approval.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे