शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

women day 2020 :  तुम्हीही सुपरवुमन सिंड्रोमच्या बळी नाही ना ; जाणून घ्या कारणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2020 6:00 AM

लक्षणं ओळखून उपचार घेणाऱ्या खूप कमी जणी असल्या तरी दुसरीशी बरोबरी करून रडत, कुढत, मन मारून जगणाऱ्या आणि तरी चेहऱ्यावर खोटं हसू ठेवणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 

नेहा सराफ :

अस्मिता...शाळेत कायम पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणार..  ऑफिसमध्येही तिच्या कामाचं कायम कौतुक होतं, घरातही आदर्श सून, पत्नी आणि आई म्ह्णवली जाते. पण गेले काही दिवस तिची चिडचिड प्रमाणाबाहेर वाढत आहे. आदर्श होण्याच्या नादात तिने स्वतःला कामात इतकं जखडून घेतलं आहे की इतरांनीही तसंच वागावं अशी तिची अपेक्षा आहे. नवराच नाही तर तिला ओळखणारा  प्रत्येक जण तिच्या कटकट्या स्वभावाला वैतागला आहे. तिलाही क्षणात राग येतोय, रडू येतंय, अस्वस्थ वाटतंय अशी विचित्र लक्षणं जाणवत आहेत. अखेर समुपदेशनासाठी गेली तेव्हा तिला कळलं ते सुपर वुमन सिंड्रोमबद्दल. 

मी आयुष्यातल्या प्रत्येक आघाडीवर लढून पहिलंच स्थान मिळावेन असा अट्टाहास असणाऱ्या अनेकींना सध्या या सिंड्रोमने जखडलं आहे. आदर्श मुलगी,पत्नी, आई, सून, कर्मचारी अशा प्रत्येक ठिकाणी 'परफेक्ट' असण्याचा अट्टाहास अनेक जणींचे खच्चीकरण करताना दिसत आहे. वेळीच लक्षणं ओळखून अस्मितासारख्या उपचार घेणाऱ्या खूप कमी जणी असल्या तरी दुसरीशी बरोबरी करून रडत, कुढत, मन मारून जगणाऱ्या आणि तरी चेहऱ्यावर खोटं हसू ठेवणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 

अनेकदा शक्य असतानाही केवळ प्रतिष्ठेचा प्रश्न करून महिला स्वतःकडे जबाबदाऱ्या घेतात. नवरा, मुलं आणि सहकारीसुद्धा त्यातल्या काही जबाबदाऱ्या पार पडू शकत असताना 'मीच करणार' ही जिद्द त्यांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या दमवणारी असते. त्यांची ही जिद्द  हळूहळू हट्टामध्ये बदलते आणि पहिला परिणाम त्यांच्यावरच होतो. अनेक शारीरिक आणि मानसिक आजार सुरु होतात. मी प्रत्येकाचं करते पण मला कोणीच समजून घेत नाही ही जाणीव इतकी भिनते की त्या मानसिक दृष्टया कोलमडतात आणि नैराश्याच्या मार्गाने अगदी आत्महत्येपर्यंतही पोहचू शकतात.

 याबाबत समुपदेशक डॉ वैजयंती पटवर्धन म्हणतात की, 'मुळात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने संधी उशिरा मिळाली आहे. त्यामुळे त्या स्वतःला सिद्ध करण्यासाठी अधिक धडपड करतात. स्वतःची शारीरिक क्षमता लक्षात न घेता ध्येय गाठण्यासाठी पळतात. त्यात भारतीय स्त्रियांना कुटुंब आणि करिअर असा संगम साधायचा असतो. त्यामुळे सगळ्या आघाड्यांवर अग्रस्थानी असण्याचा आग्रह वूमन सिंड्रोममध्ये बदलतो. त्यामुळे स्वतःच्या मर्यादा ओळखून,  झेपतील अशी ध्येय ठेवण्याची आवश्यकता आहे. अन्यथा येणारं नैराश्य टाळता येणे शक्य नाही'. 

सुपर वूमन सिंड्रोम : 

  • कारणं : 

कायम परफेक्शनिस्ट असण्याचा अट्टहास 

कायम कौतुकच व्हावे अशी अपेक्षा 

स्पर्धेत पहिलेच येण्याचा ध्यास 

मनातले न बोलल्याने साठलेले एकटेपण 

  • लक्षणं :

कोणत्याही कारणावरून चिडचिड होणे 

क्षुल्लक गोष्टीवरून रडू येणे 

विसराळूपणात वाढ

अस्वस्थता, सतत घाम येणे 

  •  परिणाम  :

बी.पी. वाढणे 

हॉर्मोन बॅलन्स बिघडणे 

कशातही मन न लागणं 

आत्मविश्वास कमी होणे 

  • उपाय :

स्वतःला वेळ द्या 

छंद, आवडीनिवडी आवर्जून जोपासा 

स्पष्टपणे नाही म्हणायला शिका 

स्वतःचे अपयश स्वीकारा 

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स