शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी अंधश्रद्धेचा उतारा?

By admin | Updated: July 7, 2015 04:12 IST

निवडणुका कोणत्याही असो, त्यांचे बिगुल वाजले की, गावोगावी सुरू होते बुवाबाजी़ लिंबू-मिरचीचे उतारे़, गंडे़, नाडे व अजून बरेच काही. मळवलीनजीकच्या देवले गावचा सोमवारचा दिवस असाच काहीसा उजाडला़

लोणावळा : निवडणुका कोणत्याही असो, त्यांचे बिगुल वाजले की, गावोगावी सुरू होते बुवाबाजी़ लिंबू-मिरचीचे उतारे़, गंडे़, नाडे व अजून बरेच काही. मळवलीनजीकच्या देवले गावचा सोमवारचा दिवस असाच काहीसा उजाडला़ प्रत्येक घराच्या दरवाजासमोर लिंबू व त्यावर गुलाल टाकलेला होता़ शेजारच्यांनी खोडसाळपणा केला असल्याच्या संशयावरून व भीतीपोटी शेजाऱ्या-पाजाऱ्यांमध्ये भांडणे झाली. नंतर कळले की, गावातील बहुतांश घरांच्या बाहेर हीच स्थिती आहे़ आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हा कुटिल डाव असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मग तर्क-वितर्क लढविले जाऊ लागले, हे काम नेमके कोणाचे?, यामागील खरा सूत्रधार कोण? कोणी सांगू लागले, गावात बुवा आला होता. होमहवन झाले. इतर बरेच काही विधी करण्यात आले. मात्र, या प्रकारामुळे गावात विशेषत: महिलावर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे़ महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा झाला. मात्र, नागरिकांच्या मनातील भीतीचे काय, हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा पुढे आला आहे़पाटण गावात ४ आॅगस्ट रोजी ग्रामपंचायतीची निवडणूक आहे़ निवडणूक कार्यक्रम व आरक्षणे जाहीर झाल्यापासून गावांमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे़ यातूनच पॅनल व रात्र बैठका, गाव बैठका यांमुळे गावं रात्रन््रात्र जागत आहेत़ जमिनींचा पैसा मोठ्या प्रमाणात आल्याने युवकांमध्ये निवडणुकीची मोठी चुरस व ईर्षा निर्माण झाल्याने प्रस्थापितांचेदेखील धाबे दणाणले आहे़ या चढाओढीतूनच हा प्रकार घडला असून, नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करायचे व त्यातून राजकीय पोळी भाजण्याची ही क्लृप्ती असल्याचा संशय व्यक्त होत आहे़ लोहगड किल्ल्याच्या पायथ्याला डोंगराच्या कुशीमध्ये वसलेले पाटण गाव. बोरज व पाटण अशी ही ग्रुप ग्रामपंचायत असून, ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असे प्रकार घडणे चिंताजनक आहे़ मोठ्या प्रमाणात हे उतारे पडल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे़ ग्रामस्थांनी या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांना याबाबत भेटून सविस्तर माहिती दिली आहे़ योग्य तो तपास करण्याचे आश्वासन निरीक्षक प्रदीप काळे यांनी ग्रामस्थांना दिले़(वार्ताहर)