भाजप- रिपाईच्या वतीने सुनिता वाडेकर यांचा उपमहापौरपदासाठी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 21:22 IST2021-03-31T21:21:51+5:302021-03-31T21:22:41+5:30
दरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्यावतीने लता राजगुरू यांनीही उपहापौरपदासाठी अर्ज भरला आहे.

भाजप- रिपाईच्या वतीने सुनिता वाडेकर यांचा उपमहापौरपदासाठी अर्ज
पुणे : भाजपने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या आपल्या महापालिकेतील सहकारी पक्षाला अखेर उमहापौर पद शेवटचे एक वर्ष देऊ केले असून, बुधवारी भाजप-रिपाईच्यावतीने रिपाईच्या महापालिकेतील गटनेत्या सुनिता वाडेकर यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरला आहे़
नगरसचिव शिवाजी दौंडकर यांच्याकडे वाडेकर यांनी अर्ज सादर केला़ यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, रिपाईचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर आदी उपस्थित होते़
दरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्यावतीने (महाविकास आघाडीच्यावतीने) लता राजगुरू यांनीही उपहापौरपदासाठी अर्ज भरला आहे.
--------