उन्हाळी सुट्टी विशेष! पुणे-हजरत निजामुद्दीन दरम्यान वातानुकूलित १४ विशेष गाड्या धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 16:02 IST2025-04-09T16:02:07+5:302025-04-09T16:02:50+5:30

पुणे-हजरत निजामुद्दीन दरम्यान वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाडी १५ एप्रिल ते २७ मेपर्यंत दर मंगळवारी पुणे येथून सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी हजरत निजामुद्दीन येथे पोहोचणार

Summer vacation special! 14 air-conditioned special trains will run between Pune-Hazrat Nizamuddin | उन्हाळी सुट्टी विशेष! पुणे-हजरत निजामुद्दीन दरम्यान वातानुकूलित १४ विशेष गाड्या धावणार

उन्हाळी सुट्टी विशेष! पुणे-हजरत निजामुद्दीन दरम्यान वातानुकूलित १४ विशेष गाड्या धावणार

पुणे : उन्हाळी सुटीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता पुणे ते हजरत निजामुद्दीन दरम्यान १४ वातानुकूलित विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

पुणे-हजरत निजामुद्दीन दरम्यान वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाडी (ट्रेन क्र. ०१४४१) गाडी १५ एप्रिल ते २७ मेपर्यंत दर मंगळवारी पुणे येथून सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी हजरत निजामुद्दीन येथे पोहोचणार आहे. या दरम्यान ७ गाड्या धावणार आहेत. तर विशेष (ट्रेन क्र. ०१४४२) गाडी १६ एप्रिल ते २८ मेपर्यंत दर बुधवारी हजरत निजामुद्दीन येथून रात्री १० वाजून २० मिनिटांनी सुटणार असून, दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी पुणे येथे पोहोचणार आहे. या दरम्यान ७ गाड्या धावणार आहेत. या गाडीला लोणावळा, कल्याण, भिवंडी रोड, कामण रोड, वसई रोड, पालघर, वापी, वलसाड, सुरत, वडोदरा, रतलाम, नागदा जंक्शन, डकनिया तलाव, भवानी मंडी, सवाई माधोपुर, गंगापूर सिटी, मथुरा जंक्शन आणि पलवल आदी स्थानकावर थांबे देण्यात आले आहेत.

पुणे-नागपूर दरम्यान उन्हाळी विशेष १४ गाड्या धावणार

 पुणे-नागपूर दरम्यान वातानुकूलित साप्ताहिक विशेष १४ गाड्या धावणार आहेत. यामध्ये विशेष (ट्रेन क्र. ०१४३९) दि. १२ ते २४ मेपर्यंत दर शनिवारी पुणे येथून रात्री ७ वाजून ५५ मिनिटांनी सुटणार असून, दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी नागपूर येथे पोहोचणार आहे. या दरम्यान ७ गाड्या धावणार आहे. तर विशेष (ट्रेन क्र. ०१४४०) गाडी दि. १३ ते २५ मेपर्यंत दर रविवारी नागपूर येथून दुपारी ४ वाजून १५ मिनिटांनी सुटणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी पुणे येथे पोहोचणार आहे. या दरम्यान ७ गाड्या धावणार आहे. या गाडीला दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा आणि वर्धा आदी स्थानकावर थांबे देण्यात आले आहेत.

Web Title: Summer vacation special! 14 air-conditioned special trains will run between Pune-Hazrat Nizamuddin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.