वाघोली येथील नवले हॉस्पिटलमध्ये नर्सची गळफास घेत आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 17:40 IST2019-02-03T17:39:47+5:302019-02-03T17:40:15+5:30
प्रियंका ही मूळची लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील केल्लाळ गावची रहिवासी असून मागील काही दिवसांपासून ती हॉस्पिटलमध्ये नर्सचे काम करत होती.

वाघोली येथील नवले हॉस्पिटलमध्ये नर्सची गळफास घेत आत्महत्या
पुणे : वाघोली येथील नवले हॉस्पिटलमध्ये शनिवारी रात्री २१ वर्षीय नर्सने ओढणीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली आहे. प्रियंका केरबा कांबळे (वय २१) असे आत्महत्या केलेल्या नर्सचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी नवले हॉस्पिटल मधील डॉक्टर अक्षय खांदवे यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, प्रियंका ही मूळची लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील केल्लाळ गावची रहिवासी असून मागील काही दिवसांपासून ती हॉस्पिटलमध्ये नर्सचे काम करत होती. मात्र, प्रियंकाने आत्महत्या का केली हे मात्र अजुन अस्पष्ट आहे. या घटनेचा पुढील तपास लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.