पुण्यात तेराव्या मजल्यावरून उडी मारून वेटरची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 03:56 PM2021-11-20T15:56:36+5:302021-11-20T15:59:34+5:30

लोकांनी त्याला खूप थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने कुणाचे न ऐकता काही क्षणातच खाली उडी घेतली...

suicide by jumping from the thirteenth floor mundhva | पुण्यात तेराव्या मजल्यावरून उडी मारून वेटरची आत्महत्या

पुण्यात तेराव्या मजल्यावरून उडी मारून वेटरची आत्महत्या

Next

पुणे : मला फसवून माझ्याकडून वाईट कामे करून घेत असल्याचे फेसबुक लाईव्ह येऊन सांगत एका हॉटेलमधील कामगाराने तेराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. अरविंद सिंह राठौर (वय २६, रा. सनेती, उत्तराखंड) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी, मुंढवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (दि.१७) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. अरविंद एक महिन्यापूर्वी हॉटेलमध्ये कामासाठी आला होता.

मुंढवा परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलच्या तेराव्या मजल्यावरून कामगाराने (वेटर) उडी मारून आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. फेसबुक लाइव्हमध्ये त्यांनी हॉटेलमधील काही लोकांनी त्याला फसवले असून, त्याच्याकडून काही कामे करून घेतल्याचे सांगितले आहे. अरविंद हा मूळचा उत्तराखंडचा रहिवासी आहे. मुंढवा परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये तो एक महिन्यापूर्वीच कामाला आला होता. बुधवारी रात्री तो हाटेलच्या टेरिसवर (तेराव्या मजल्यावर) उभा होता. त्यावेळी त्याने फेसबुक लाईव्ह करत तो आत्महत्या करणार असल्याचे म्हटले.

त्यानंतर तो इमारतीच्या भिंतीवर उभा राहिला. तेथील लोकांनी त्याला खूप थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने कुणाचे न ऐकता काही क्षणातच खाली उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, पोलिस उपनिरीक्षक भोसले व त्यांच्या साथीदारांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अरविंद रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला होता. उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: suicide by jumping from the thirteenth floor mundhva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app