खेड तालुक्यात शेतकऱ्याची विषप्राशन करुन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 21:25 IST2018-10-22T21:21:38+5:302018-10-22T21:25:56+5:30

दावडी येथील शेतकऱ्याने काळुस गावच्या हद्दीतील जाचक यांच्या शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

Suicide by farmer in Khed taluka | खेड तालुक्यात शेतकऱ्याची विषप्राशन करुन आत्महत्या

खेड तालुक्यात शेतकऱ्याची विषप्राशन करुन आत्महत्या

चाकण : दावडी ( ता.खेड ) येथील शेतकरी मारुती बाबुराव घाडगे (वय ५०) यांनी काळुस गावच्या हद्दीतील जाचक यांच्या शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असून चाकण पोलीस ठाण्यात आकस्मित मयत दाखल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे अंमलदार सुभाष पवार यांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान काळूस गावच्या हद्दीत जाचक वस्ती येथील बबन विठ्ठल जाचक यांच्या शेतात घडली. याबाबतची माहिती पोलीस पाटील संदीप किसन पवळे (वय ४१, रा. काळूस) यांनी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार हरगुडे हे पुढील तपास करीत आहेत. 
 

Web Title: Suicide by farmer in Khed taluka