पत्नीच्या अनैतिक संबंधावरून पतीची गळफास घेऊन आत्महत्या; ९ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 09:02 IST2022-06-27T09:00:51+5:302022-06-27T09:02:06+5:30

मानसिक तणावातून तरुणाने घेतला गळफास

Suicide by strangulation of husband over wife's immoral relationship Filed a case against 9 persons | पत्नीच्या अनैतिक संबंधावरून पतीची गळफास घेऊन आत्महत्या; ९ जणांवर गुन्हा दाखल

पत्नीच्या अनैतिक संबंधावरून पतीची गळफास घेऊन आत्महत्या; ९ जणांवर गुन्हा दाखल

पुणे : सासरकडील मंडळींनी संगनमत करून वेळोवेळी भांडण करणे आणि पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे कळल्यावरून मानसिक तणावातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली़ कोहिनूर शिंदे (रा. दत्तनगर, पिंपरी सांडस, हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी मृताच्या पत्नीसह ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मृताचे वडील हिरू पांडू शिंदे (वय ५४, रा. दत्तनगर, पिंपरी सांडस, हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार पिंपरी सांडस येथे २०२१ ते १ जून २०२२ दरम्यान घडला.

अधिक माहितीनुसार, कोहिनूर शिंदे यास त्याच्या सासरकडील मंडळींनी संगनमत करून वेळोवेळी भांडण केले. त्याच्या पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचे सायबू शिंदे याने सांगितले. त्यामुळे मानसिक तणावातून कोहिनूर याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.

Web Title: Suicide by strangulation of husband over wife's immoral relationship Filed a case against 9 persons