शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Pune: प्रेम प्रकरणातून तरुणाची स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या; आठचं महिन्यापूर्वी झाले होते लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 21:15 IST

प्राथमिक माहितीनुसार तरुणाचे एका तरुणी सोबत प्रेम संबंध होते

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 26 वर्षीय तरुणानं प्रेम प्रकरणातून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. डिसेंबर 2021 मध्ये या तरुणाचं लग्न झालं होतं. विशाल राजेंद्र तोडकर (वय 26, रा. भागीरथीनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल हा कपड्याच्या व्यासायिक होता. पुणे शहरात त्याची कपड्याची दुकाने आहेत. डिसेंबर 2021 मध्ये त्याचे लग्न झाले होते. सध्या तो हडपसर परिसरात पत्नी आणि आई सोबत राहत होता. प्राथमिक माहितीनुसार विशाल याचे एका तरुणी सोबत प्रेम संबंध होते. याच कारणावरून मागील काही दिवसांपासून त्याचे घरात वाद होत होते. यामुळे पत्नीही माहेरी निघून गेली होती. दरम्यान पत्नी माहेरी गेल्यामुळे तो मागील काही दिवसांपासून नैराशात होता. 

दरम्यान रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्याने स्वतःवर गावठी पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. आज सकाळी तो फोन उचलत नसल्याने कुटुंबीयांनी घरी येऊन पाहणी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्याने स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेत जीवन संपवले होते. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, विशालकडे गावठी पिस्तूल कोठून आले. त्याबाबत त्याच्या कुटूंबाकडे व मित्रांकडे विचारपूस केली जात आहे, परंतु, त्याबाबत कोणालाच माहिती नसल्याचे समोर आले आहे. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकmarriageलग्नDeathमृत्यू