शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बहुसंख्य भाजप नेतेमंडळींचे साखर कारखाने अजूनही बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 06:00 IST

एफआरपीची थकबाकी : आयुक्तांकडून गाळपाची परवानगी प्रलंबित

ठळक मुद्देमाजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे असलेले  बैद्यनाथ, नांदेडमधील पन्नगेश्वर हे दोन कारखाने अनुक्रमे ४ कोटी, ६ कोटी रुपये थकबाकी असल्याने बंद आहेत.

पुणे : राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या बहुसंख्य नेत्यांचे साखर कारखाने गाळप हंगाम सुरू होऊन महिना झाला तरी अजून बंदच आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्यातील माजी मंत्री  पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे, बबनराव पाचपुते यांच्या कारखान्यांचा यामध्ये समावेश आहे. तब्बल २३७ कोटी ३५ लाख रुपयांची थकबाकी असल्याने   साखर आयुक्त कार्यालयाने त्यांचा गाळपाचा परवाना रोखून ठेवला आहे.यातील काही कारखाने खासगी आहेत, तर काही सहकारी आहेत. केंद्रीय मंत्री असलेल्या रावसाहेब दानवे यांचा जालनामधील रामेश्वर कारखाना बंद आहे. त्यांच्याकडे २ कोटी ७४ लाख रुपये थकबाकी आहे. अहमदनगरमधील साईकृपा हा माजी मंत्री पाचपुते यांचा कारखाना बंद आहे. त्यांच्याकडे २७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. अहमदनगरमधीलच राधाकृष्ण विखे यांच्याकडे असलेला राहुरीतील डॉ. बाबूराव तनपुरे कारखानाही बंद असून, त्यांच्याकडे १४ कोटी ६७ लाख रुपयांची थकबाकी आहे.

माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे असलेले  बैद्यनाथ, नांदेडमधील पन्नगेश्वर हे दोन कारखाने अनुक्रमे ४ कोटी, ६ कोटी रुपये थकबाकी असल्याने बंद आहेत. त्यांच्याकडेच असलेल्या अंबाजोगाई कारखाना बंद आहे, मात्र त्यांच्याकडे थकबाकी नसून त्यांनी ती जमा केल्याची कागदपत्रे अद्याप सादर केलेली नाहीत. हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर कारखाना व सोलापूरमधील इंद्रेश्वर कारखान्याकडे अनुक्रमे १२ कोटी ५० लाख व १० कोटी ६५ लाख रुपयांची थकबाकी आहे. या दोन्ही कारखान्यांची गाळपाची परवानगी त्यामुळे प्रलंबित आहे. रणजित मोहिते यांचा सोलापूरमधील शंकर कारखाना ३० कोटी ७६ लाखांच्या थकबाकीमुळे बंद आहे. मदन पाटील यांचे किसनवीर भुईज व किसनवीर खंडाळा हे दोन्ही कारखाने बंद आहेत. त्यांच्याकडे अनुक्रमे ५५ कोटी ९१ लाख व १७ कोटी रुपये थकीत आहेत.

‘शुगर बेल्ट’मधील कारखान्यांचाही समावेशतासगाव सांगली (२.९४), यशवंत खानापूर (९.८), विश्वास कोल्हापूर (३.७३), टोकाई नांदेड(१०.००), साईबाबा नांदेड(३.३०), मकाई सोलापूर(६.३४), मातोश्री लक्ष्मी सोलापूर(५.००),  आयन मल्टिट्रेड सोलापूर (३.०१) हे कारखानेही शेतकऱ्यांची थकबाकी ठेवल्यामुळे बंद आहेत. औरंगाबादच्या सिद्धेश्वरने अद्याप थकबाकी नसल्याची कागदपत्रे सादर केलेली नाहीत, त्यामुळे त्यांचीही परवानगी प्रलंबित आहे.

टॅग्स :PuneपुणेPankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपा