शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

धनकवडी येथे पीएमपी बसने मध्यरात्री घेतला अचानक पेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2019 11:18 AM

स्वारगेट डेपोमधून ही बस कात्रज कडे जात होती. भारती विद्यापीठच्या चढण मार्गावर इंजिन गरम झाल्यामुळे रात्री दोन वाजता या बसने पेट घेतला.

धनकवडी : पुणे शहरात पीएमपी बस आणि दुर्घटना हे जणू समीकरणच बनले आहे. बस बंद पडण्याच्या आणि बसला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत याचीच प्रचिती धनकवडी येथील भारती विद्यापीठ मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाली. भारती विद्यापीठच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर शुक्रवारी रात्री दोन वाजता बसने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी बाजूला घेतली. रात्रीची वेळ असल्याने गाडीत प्रवासी नव्हते त्यामुळे सुदैवाने जिवीतहानी झाली नाही मात्र बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कात्रज अग्निशामक दलाच्या जवानांनी ताबडतोब बसला लागलेली आग आटोक्यात आणली.

स्वारगेट डेपोमधून ही बस कात्रज कडे जात होती. भारती विद्यापीठच्या चढण मार्गावर इंजिन गरम झाल्यामुळे रात्री दोन वाजता या बसने पेट घेतला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की शुक्रवारी रात्री स्वारगेट डेपो वरुन हि बस कात्रज कडे गँस भरण्यासाठी जात होती. भारती विद्यापीठच्या चढण मार्गावर बस आल्यावर बसचे इंजिन गरम झाले आणि इंजिन मधून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला. बस चालक वसंत कदम यांनी तात्काळ बस रस्त्याच्या कडेला घेतली. आणि अग्निशामक केंद्राशी संपर्क साधला. 

कात्रज अग्निशामक केंद्रातील जवान ताडेल ढवळे , चालक शाबिर शेख , देवदूतचा चालक राहुल मालुसरेफायरमन वसंत भिलारे, किरण पाटील, तेजस माडवकर, भरत वाडकर, सागर इंगळे, निलेश तागुंदे, श्रीकांत वाघमोडे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने गाडीमध्ये प्रवासी नव्हते मात्र धूर मोठ्या प्रमाणात येत होता. बसच्या इंजिनच्या खालच्या बाजूला आग लागली होती. जवानांनी काही मिनिटातच आगीवर नियंत्रण मिळविले.  इंजिन मधून येत असलेल्या मोठ्या प्रमाणावरील धुरामुळे आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आले, त्याने लगेच अग्निशामक केंद्राला संपर्क साधला त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

टॅग्स :DhankawadiधनकवडीPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडेfireआग