जिद्द, चिकाटी आणि संघर्षातून मिळवले यश;जुन्नर मधील शेतकऱ्याचा मुलगा झाला आधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 19:48 IST2025-07-09T19:47:38+5:302025-07-09T19:48:10+5:30
ऋषिकेश मांडे याचा सर्व प्रवास सर्वाना प्रेरणा देणारा आहे . अनेक चढउतार या विद्यार्थ्याच्या आयुष्यात आले. मात्र त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा सोडली नाही . अनेकदा अपयश आल तेही पचवून घेतले .

जिद्द, चिकाटी आणि संघर्षातून मिळवले यश;जुन्नर मधील शेतकऱ्याचा मुलगा झाला आधिकारी
नारायणगाव : अनेकदा अपयशाला गवसणी घालत, कॉर्पोरेट मध्ये जॉब करत जुन्नर तालुक्यातील येडगाव (गणेशनगर) येथील शेतकऱ्याचा मुलगा ऋषिकेश विलास मांडे यांची रेल्वे मध्ये आगार अधीक्षक म्हणून निवड झाली आहे.रेल्वे मध्ये आगार अधीक्षक (Depot Superintendent) आणि सोबतच कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) या पदांवर निवड झाल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. ऋषिकेश मांडे याचा सर्व प्रवास सर्वाना प्रेरणा देणारा आहे . अनेक चढउतार या विद्यार्थ्याच्या आयुष्यात आले. मात्र त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा सोडली नाही . अनेकदा अपयश आल तेही पचवून घेतले . तथापि त्याच्या या प्रवासात त्याच्या आई वडिलांनी आणि बहिणीने खंबीर साथ दिली.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असतानाही कुटुंबाने अपार कष्ट करून मुलाला शिकवले. सर्वप्रथम त्याने पदवी झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास तयारी सुरू केली. नारायणगाव येथील राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान जुन्नर तालुका संचलित रॉयल अकॅडेमी नारायणगाव येथे अभ्यास सुरु केला. नंतर मधील काळात त्याने २०२२ मध्ये कॉर्पोरेट मध्ये जॉब करत अभ्यास सुरू ठेवला.
त्याची जिद्द, चिकाटी आणि आधिकारी व्हायचंय हा ध्यास, कुटुंबाला या हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा मनोदय व संयम तसेच कुटुंबाची साथ यामुळेच आज तो अधिकारी झाला. नारायणगाव येथील रॉयल अकॅडेमीच्या माध्यमातून आत्तापर्यंत ७५ विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या सरकारी नौकरी मध्ये आहेत .
सन २०२४ मध्ये ३३ विदयार्थी सरकारी सेवेत दाखल झाले तर २०२५ च्या पहिल्या ६ महिन्यातच विकी बिरे (बृहमुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक ), समाधान शेरखाने (विद्युत सहायक पदी ) यांची निवड झाली आहे, २०१९ पासून नारायणगाव मध्ये कार्यरत असणाऱ्या ह्या अकॅडेमीच्या यशात नारायणगावचे लोकनियुक्त माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच योगेश उर्फ बाबू पाटे यांचा मोलाचा वाटा आहे, अशी माहिती रॉयल अकॅडमीचे संचालक प्रथमेश वाणी यांनी दिली.