शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशखिंड रस्त्यावरील वृक्षतोडीप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करा;उच्च न्यायालयाचे महापालिका आयुक्तांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 11:04 IST

उच्च न्यायालयाचे पुणे महापालिका आयुक्तांनी ७ जानेवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले

पुणे : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील आनंदऋषीजी चौकात उभारण्यात येणाऱ्या दुमजली उड्डाणपुलासाठी गणेशखिंड रस्ता ३६ मीटरवरून ४५ मीटर रुंद करण्यात येणार आहे. यासाठी रस्त्यावरील झाडे तोडण्यात येणार आहेत. याविरोधात परिसर या स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर पुणे महापालिका आयुक्तांनी ७ जानेवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय व न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी हा आदेश दिला. उच्च न्यायालयाने १७ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी काय पावले उचलली याची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र पुणे महापालिका आयुक्तांनी स्वत: किंवा उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दाखल करावे. त्यामध्ये यापूर्वी दिलेल्या आदेशाच्या परिच्छेद पाचमध्ये नमूद केल्याप्रमाणे समितीने केलेल्या शिफारशींचे पालन करण्यासाठी कोणती पावले उचलली, याचा तपशील द्यावा. या प्रतिज्ञापत्राची महापालिका आयुक्त स्वत: पडताळणी करतील. तसेच न्यायालयाच्या आदेश पालनात त्रुटी असल्यास त्याची दखल गांभीर्याने घेतली जाईल, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.या प्रकरणी परिसर संस्थेने पुणे महापालिकेविरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. त्यावर रस्ता रुंदीकरणात बाधा ठरणाऱ्या ७२ झाडांचे पुनर्रोपण करण्याच्या अटीवर मुंबई उच्च न्यायालयाने ही झाडे काढण्यास परवानगी दिली. मात्र, महापालिकेने या निर्देशांचे पालन केले नसल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. त्यामध्ये महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह पथ विभागाचे अभियंता, वृक्ष प्राधिकरणाचे अधिकारी आणि राज्य सरकारला प्रतिवादी करण्यात आले आहे. त्याची गंभीर दखल उच्च न्यायालयाने घेतली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडenvironmentपर्यावरणCourtन्यायालयMuncipal Corporationनगर पालिकाPlantsइनडोअर प्लाण्ट्सpollutionप्रदूषण