शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील उपबाजार सुरू ; गुलटेकडीचा मुख्य बाजार कधी सुरू होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 18:04 IST

ठराविक काळासाठी व सोशल डिस्टन्सिंगच्या अटींवर बाजार सुरू

ठळक मुद्देपुण्यातील मुख्य बाजार कधी सुरू होणार असा सवाल उपस्थितगुलटेकडी येथील मुख्य बाजार आवारातील फळे, भाजीपाला आणि कांदा व बटाटा विभाग बंद

पुणे: पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या संसगार्मुळे गेल्या पाच दिवसांपासून गुलटेकडी येथील मुख्य बाजार आवारातील फळे, भाजीपाला आणि कांदा व बटाटा विभाग बंद आहेत. यामुळे शहरातील नागरिकांचे प्रचंड हाल होत असून. काही प्रमाणात उपलब्ध होणारा शेतीमाल प्रचंड चढ्या दराने खरेदी करावा लागत आहे. याबाबत पोलिस, जिल्हा प्रशासन व बाजार समिती प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत शहरालगतचे उपबाजार काही ठराविक कालावधीत व सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मोशी व मांजरी येथील उपबाजार सुरू देखील करण्यात आले आहेत.परंतु पुण्यातील मुख्य बाजार कधी सुरू होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. शहरातील नागरिकांन सोबतच शेतात माल सडून चाललेल्या शेतक-यांना गुलटेकडीचा बाजार सुरु होण्याची प्रतिक्षा आहे. पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने बहुतेक निम्मे शहर सील करण्यात आले आहे. यामध्ये गुलटेकडी व मार्केट यार्ड परिसराचा देखील समावेश आहे. यात मार्केट यार्डा परिसरालगत असलेल्या झोपडपट्टीत दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. यामुळे व्यापारी, आतडे, हमाल सर्वच लोकांमधे प्रचंड धास्तीचे वातावरण आहे. यामुळे जिल्हा प्रशासनानेच गुलटेकडी येथील मुख्य बाजार आवारातील फळे, भाजीपाला व कांदा व बटाटा विभाग अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु यामुळे शहरामध्ये भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होऊन नागरिकांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे.मुंबई बाजार समिती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्यावर पुण्यातील बाजार देखील सुरू करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. यात सुरूवातीला शहरालगतचे उपबाजार काही ठराविक कालावधीत व सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून सुरू करण्यात आल्या असल्याचे बाजार समितीचे प्रशासक बी जे देशमुख यांनी स्पष्ट केले.------ प्रशासनाने सांगितले तर बाजार सुरू करू..पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा प्रशासनानेच गुलटेकडी येथील मुख्य बाजार आवार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु प्रशासनाने सांगितल्यास पुन्हा बाजार आवार सुरू करण्यास आडत्यांची काही हरकत नाही. -विलास भुजबळ, अध्यक्ष श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन

टॅग्स :Puneपुणेvegetableभाज्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFarmerशेतकरीfruitsफळे